nashik-krushi-utpanna-bajar-samiti.jpg esakal
नाशिक

Nashik APMC Election : सभापती, उपसभापतीची माळ कोणाच्या गळ्यात? निवडणूक तत्काळ घेण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Nashik APMC Election : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी पार पडून आठवडा उलटला आहे. त्यामुळे सभापती व उपसभापतीची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक तत्काळ घ्यावी. यासाठी पिंगळे गटाच्या निवडून आलेल्या सदस्यांनी आपल्या सहीनिशी लेखी पत्र जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सतीश खरे यांना दिले आहे. (Nashik APMC Election speaker Deputy Speaker Demand for immediate election nashik news)

जिल्ह्यातील अग्रगण्य असलेली नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची मागील महिन्यात रणधुमाळी सुरू होती. यासाठी २८ एप्रिलला मतदान झाले आणि २९ एप्रिलला मतमोजणी झाली. यात पिंगळे गटाने १२ जागा, तर चुंभळे गटांनी सहा जागांवर विजय प्राप्त केला.

उमेदवार विजयी होवुन आठवडा उलटला आहे. तरीदेखील सभापती उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली नाही. पिंगळे गटाचे वर्चस्व असले तरी विरोधी पॅनल काही चमत्कार करतो का, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

सभापती निवड प्रक्रियेत कोणतीही बाधा येऊ नये यासाठी आपलं पॅनलच्या बारा सदस्यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवडणुकीसाठी पत्र दिले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यात राजपत्रातील अधिसूचनेनुसार महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री ( विकास व विनिमय) अधिनियम १९६३ प्रमाणे कमल १९ अन्वये नाशिक बाजार समितीत निवडून आलेल्या सदस्यांची निवड प्रक्रिया तत्काळ राबवावी, असे नमूद करण्यात आले आहे.

"निवडणूक निकाल लागल्यानंतर ३० दिवसांत सभापती व उपसभापती यांची निवड होणे बंधनकारक आहे. नाशिक बाजार समितीसाठी पत्र आलेले असून, त्यानुसार प्रक्रिया सुरू केली आहे." - सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी

यांनी केली मागणी

देवीदास पिंगळे, संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, उत्तम खांडबहाले, विनायक माळेकर, सविता तुंगार, जगन्नाथ कटाळे, भास्कर गावित, निर्मला कड, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम यांनी सहीनिशी पत्र देत मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT