MLA Kishore Darade while addressing teachers' questions at the Deputy Director of Education office in Pune. In the second photo, a teacher protesting in front of the office. esakal
नाशिक

Nashik News: शिक्षकांच्या रखडलेल्या 110 पदांना मंजुरी! आमदार दराडेंकडून पुण्यात आंदोलनानंतर नमले प्रशासन

Nashik News : या आंदोलनामुळे ११० जणांचे अनुकंपा मान्यता, शालार्थ आदेश, अर्धवेळ मान्यता, पूर्णवेळ मान्यता, प्राचार्य मान्यता, निवड श्रेणी प्रकरणे व शालार्थ प्रकरणांना मंजुरी मिळत चालना मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला‌ : उत्तर महाराष्ट्रातील शेकडो शिक्षकांच्या प्रलंबित प्रस्तावांना पुणे येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयाकडून लालफितीचा रस्ता दाखविण्यात आल्याने संतप्त झालेल्या नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पुणे येथे थेट रास्ता रोको आंदोलन करून आक्रमक पवित्रा घेतला. या आंदोलनामुळे ११० जणांचे अनुकंपा मान्यता, शालार्थ आदेश, अर्धवेळ मान्यता, पूर्णवेळ मान्यता, प्राचार्य मान्यता, निवड श्रेणी प्रकरणे व शालार्थ प्रकरणांना मंजुरी मिळत चालना मिळाली आहे. (Nashik administration bowed down agitation by MLA Darade in Pune marathi news)

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर या पाचही जिल्ह्यांतील शेकडो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे शालार्थ आयडी, वैद्यकीय देयके, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती, सेवा सातत्य, अर्धवेळ मान्यता अशा शेकडो प्रस्तावांचे भिजत घोंगडे पडलेले होते. शिक्षकांना वर्षानुवर्षे पुणे येथे चकरा माराव्या लागत होत्या. अधिकारी केवळ आश्वासनांवर बोळवण करीत होते.

यात नगर जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या लक्षणीय होती. या जिल्ह्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथे असल्याने गुरुवारी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहिरे यांच्या कार्यालयात धडक देत प्रलंबित मागण्यांबाबत विचारणा केली असता, त्यांना अधिकाऱ्यांनी थातुरमातूर उत्तरे दिल्याने शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी कडक उन्हात शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको केले. (Latest Marathi News)

यात उत्तर महाराष्ट्रातून महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख (नाशिक), संभाजी पाटील (जळगाव), आप्पा शिंदे (नगर), वैभव सांगळे, प्रकाश हिंगे (राहुरी) बी. बी. पाटील आदींच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षक सहभागी झाले. पोलिसांनी केलेले आवाहन आमदार दराडे यांनी धुडकावल्याने अखेर पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी आंदोलनस्थळी येत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

आमदार दराडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याने सर्व मागण्या मान्य करून सायंकाळी उशिरापर्यंत तब्बल ११० शिक्षकांच्या प्रलंबित प्रकरणांच्या फाइल मंजूर करून त्यांच्या हाती सोपविण्यात आल्या.

"शिक्षकांचे अनेक प्रश्न रखडून ठेवले जातात, दखल घेतली जात नसल्यामुळे आंदोलन केले. या आंदोलनामुळे २५ अनुकंपा मान्यता, ३५ शालार्थ आदेश, आठ अर्धवेळ मान्यता, सहा पूर्णवेळ मान्यता, २२ प्राचार्य मान्यता, आठ निवड श्रेणी प्रकरणे व ५२ शालार्थ प्रकरणे वरिष्ठ कार्यालय येथे पाठविण्यात आले. शिक्षकांचे रखडलेले प्रस्ताव मार्गी लागले असून, जागेवर त्यांना मान्यता व मंजुरीपत्रे मिळाली."- किशोर दराडे, शिक्षक आमदार, नाशिक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Election 2025 : बिहारमध्ये मोठी घडामोड! स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता 'या' पक्षाने अचानक निवडणुकीतूनच घेतली माघार

R Ashwin: 'भारतीय क्रिकेटमध्ये सर्वकाही अप्रत्यक्षपणे घडतंय...' शमी-आगरकर वादानंतर अश्विनला नेमकं काय म्हणायचंय?

Crime News : दोन मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, नकार मिळताच उचललं धक्कादायक पाऊल, नेमकं काय घडलं? वाचा...

flight caught fire mid-air VIDEO : उडत्या विमानात अचानक भडकली आग; प्रवाशांची आरडाओरड अन् पळापळ...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये खाजगी बसचा अपघात, ८ जण जखमी

SCROLL FOR NEXT