Yashwantrao Chavan felicitated with the winners of various categories of Central Youth Festival at Maharashtra Open University. esakal
नाशिक

Nashik YCMOU News : कलाविष्कार, तरुणाईमध्ये ऊर्जेचा संचार; मुक्‍त विद्यपीठातील केंद्रीय युवक महोत्सवातून जिंकली मने

YCMOU : युवा कलावंतांनी थक्‍क करणारे कलाविष्कार सादर केले. उत्‍कृष्ट सादरीकरणासाठी तरुणाईमध्ये जणू ऊर्जा संचारली होती.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : युवा कलावंतांनी थक्‍क करणारे कलाविष्कार सादर केले. उत्‍कृष्ट सादरीकरणासाठी तरुणाईमध्ये जणू ऊर्जा संचारली होती. औचित्‍य होते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शुक्रवारी (ता. ११) झालेल्या केंद्रीय युवक महोत्सवाचे. युवा कलावंतांच्‍या कलागुणांचा अविष्कार असलेल्या या महोत्सवात विद्यापीठाच्या नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या आठ विभागीय केंद्रांतून विद्यार्थी सहभागी झाले होते. (Artists youths communication from Central Youth Festival in free university )

विजेत्‍यांची निवड ७ ते ११ नोव्हेंबरदरम्यान अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होणाऱ्या ‘इंद्रधनुष्य २०२४’साठी केली जाईल. केंद्रीय युवक महोत्‍सवाचे उद्‌घाटन नाट्य व चित्रपट अभिनेत्री अनिता दाते हिच्‍या हस्‍ते झाले. प्र-कुलगुरू प्रा. जोगेंद्रसिंह बिसेन अध्यक्षस्थानी होते. ध्येय गाठण्यासाठी झपाटून काम करत समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन अभिनेत्री अनिता दाते हिने केले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण कुलसचिव दिलीप भरड यांच्या अध्यक्षतेखाली झाले. विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य संजीवनी महाले, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्रप्रमुख डॉ. दयाराम पवार, नाट्यशास्त्र विभागाचे सहयोगी सल्लागार दत्ता पाटील, राजेंद्र वाघ उपस्थित होते. स्‍पर्धेतील परीक्षकांचा सत्‍कार झाला. (latest marathi news)

परीक्षक म्हणून श्रीराम वाघमारे, सायली कुबडे (रंगमंचीय कला विभाग), आनंद अत्रे व सुरभी गौड (संगीत), आदिती पानसे, प्रदीप गोराडे (समूह व शास्त्रीय नृत्य), राजेंद्र उगले, संजय वाघ (वांङ्‌मय), पूजा गायधनी, स्नेहल एकबोटे (ललित कला) यांनी काम पाहिले. हार्मोनियम व तबलाची साथसंगत अनुक्रमे हर्शद वडजे, रवींद्र राजोरीकर यांनी केली. डॉ. पूनम वाघ यांनी परिचय करून दिला. केंद्रप्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सचिन शिंदे यांनी आभार मानले.

गटनिहाय विजेते असे-

लोकनृत्य : अभिषेक नांदुरे, संपदा मोरे, आकांक्षा टेंभुर्णे, शास्त्रीय नृत्य : सुप्रिया घुडेकर, संगीत : सौरभ कांगणे (तालवाद्य-मृदंग), सुगम गायन : वेदश्री गवळी, पूजा बसव, जान्हवी अतकरी, पाश्चिमात्य गायन : वेदश्री गवळी, वक्तृत्व : प्रथमेश श्रीवास, जान्हवी अतकरी, करण हरण, स्थळचित्रण : युनिस शेख, सत्य निल्लेवार, प्रसाद जाधव, रांगोळी : वैभव गिरम, कोलाज : सोहेल इनामदार, स्पॉट पेंटिंग : तेजस्विनी राऊतकर, सुवेक गवळे, लोकसंगीत : कोल्हापूर विभाग संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

Ambegaon News : घोडेगाव येथे दत्त जयंती निमित्त बैलगाडा शर्यत; तीन दिवसांत ५५० हून अधिक गाड्या पळणार!

Pune Crime: आधी गुंगीचं औषध देऊन पुरुषावर अत्याचार; आता दुसऱ्याला लग्नाची गळ, गुन्हा दाखल करण्याची धमकी

Dharashiv News : नॅशनल हेल्थ सिस्टीम्स रिसोर्स सेंटर मूल्यांकन पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर; आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम!

Uruli Kanchan Crime : दारू पिण्यास पैसे न दिल्याने रागाचा उद्रेक; बिअरची बाटली डोक्यात मारून युवक जखमी; उरुळी कांचन घटना!

SCROLL FOR NEXT