Child Care esakal
नाशिक

Child Care: पाल्‍यासोबत सुसंवाद साधत टाळा संभाव्‍य धोके; डॉ. वृषिनीत सौदागर, सचिन जोशी यांनी केले पालकांना मार्गदर्शन

Nashik News : अपेक्षांचे ओझे लादताना व पाल्‍याच्‍या समस्‍या समजून न घेतल्‍यानेच अनेक समस्‍या निर्माण होतात.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अपेक्षांचे ओझे लादताना व पाल्‍याच्‍या समस्‍या समजून न घेतल्‍यानेच अनेक समस्‍या निर्माण होतात. त्‍यामुळे पाल्‍याने चांगली कामगिरी करावी, असे वाटत असेल तर त्‍यांच्‍यासोबत सुसंवाद साधत संभाव्‍य धोके व नुकसान टाळता येऊ शकते, असा सूर शुक्रवारी (ता.१) झालेल्‍या चर्चेतून उमटला. (Nashik Avoid potential dangers of interacting with babies marathi news)

कॉलेजरोडवरील गुरुदक्षिणा सभागृह येथे झालेल्‍या कार्यक्रमातून होमिओपॅथ आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वृषिनीत सौदागर आणि शिक्षण अभ्यासक व इस्पॅलिअर ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष सचिन जोशी यांनी पालकांशी संवाद साधताना मार्गदर्शन केले. ‘मुलांचे व्यक्तिमत्त्व साकारताना’ या संकल्पनेवर यावेळी मांडणी केली. पालकत्वाच्या भूमिकेतून पाल्यांचे संगोपन करताना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्तरावरील आव्हानांवर यावेळी चर्चा झाली.

अनेकदा पालकांकडून पाल्याच्या अपेक्षांची पूर्ती न होणे, पाल्याच्या योग्य दिशेने वाढीसाठी भोवताली योग्य वातावरण उपलब्ध न होणे किंवा अनेक शारीरिक व मानसिक समस्यांमुळे पाल्याच्या अध्ययन प्रक्रियेतही अडसर निर्माण होत असल्‍याचे निष्कर्ष मांडताना उपाययोजना सुचविल्‍या. पाल्यासंदर्भातील शारीरिक, मानसिक व शैक्षणिक समस्यांची शास्त्रीय उत्तरे या कार्यक्रमातून दिली. (Latest Marathi News)

तणावपूर्ण स्‍थिती बनवू नकाः जोशी

ज्‍यावेळी भावनांची सरमिसळ वाढते, तेव्‍हा बुद्धिमत्ता कमी होते. बहुतांश वेळा भीती निर्माण झाली की भावनांचा अतिरेक होतो व बुद्धिमत्ता कमकुवत होते. कुठलीही परिस्‍थिती तणावपूर्ण नसते. त्‍या परिस्थितीकडे बघण्याच्‍या दृष्टिकोनामुळे तणाव निर्माण होतो.

त्यामुळे आपल्‍या दृष्टिकोनात सुधारणा करताना तणाव टाळावा, असा सल्‍ला सचिन जोशी यांनी दिला. पालकांनी आपल्‍या पाल्‍यांवर दडपण न देता त्यांना शारीरीक व भावनिकदृष्या सुदृढ बनविण्यासाठी प्रयत्‍न केले पाहिजे, असे त्‍यांनी नमूद केले.

पाल्‍याचा आत्‍मविश्‍वास वाढवा : डॉ. सौदागर

आपल्‍या पाल्‍याचा सर्वांगिण विकास व्‍हावा, असे वाटत असेल तर पाल्‍याप्रमाणे पालकही कसे वागतात हे महत्त्वाचे ठरते. आपल्‍या पाल्‍यासोबत संवाद साधावा, त्‍यांना पुरेसा वेळ द्यावा, प्रेमाची जाणीव करून द्यावी. त्‍यांचा आत्‍मविश्‍वास वाढविण्यासाठी अभ्यासादरम्‍यान त्‍यांच्‍यात सहभागी व्‍हावे, असा सल्‍ला डॉ. वृषिनीत सौदागर यांनी दिला. बऱ्याचवेळा पाल्‍याप्रमाणे पालकही अपेक्षांच्‍या अतिशयोक्तीमुळे मानसिक आजारांचे बळी पडत असल्‍याचे सांगताना त्‍यांनी या व्‍याधींचे विविध प्रकार व लक्षणे सादरीकरणातून मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

SCROLL FOR NEXT