Such traffic jams frequently in the city. esakal
नाशिक

Nashik Traffic Problem : वाहतूक कोंडीने बागलाणकरांचा कोंडमारा! बेशिस्त वाहनचालकांपुढे पोलिसही हतबल

Traffic Problem : वाहतूक ठप्प, तासन् तास सर्व वाहने जागेवरून हलतच नाहीत अशा विचित्र अवस्थेत सटाणा शहरासह बागलाणवासियांची वाहतूक कोंडी एकच चर्चेचा विषय झाला.

अंबादास देवरे

Nashik Traffic Problem : सकाळी दहापासूनच रणरणते ऊन, बारानंतर प्रचंड उष्णतेने होणारी जीवाची लाहीलाही, बेशिस्त वाहन चालकांमुळे प्रत्येक रस्त्यावर वाहतूक ठप्प, तासन् तास सर्व वाहने जागेवरून हलतच नाहीत अशा विचित्र अवस्थेत सटाणा शहरासह बागलाणवासियांची वाहतूक कोंडी एकच चर्चेचा विषय झाला. जीवाचा होणारा कोंडमारा सहनशीलतेच्या पलिकडचा होता. ( Baglankar are in trouble due to traffic jam)

येथील मालेगाव रोड, चार फाटा ते दोधेश्‍वर नाका रस्त्यावर शुक्रवारी (ता. २६) सकाळी ११ ते दुपारी दोनपर्यंत वाहतूक ठप्प झाली. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चार फाट्यावरील पुतळ्यापासून चारही दिशेला रस्त्यांवर तब्बल दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक कोंडी झाली. तब्बल अडिच तास ४० अंश सेल्सियस तापमानात नवरदेव, वऱ्हाडींसह अबालवृद्धांना अडकून पडावे लागले.

तीच पुनरावृत्ती रविवारी (ता.२८) झाल्याने शहरवासीयांचा ठोका चुकला. सर्वात जास्त वर्दळीच्या ठिकाणी चार फाट्यावर फक्त एक वाहतूक पोलिस. तो तरी काय करणार? पोलिस ठाण्यापासून बाकीच्या अंतरावर असलेल्या ताहाराबाद नाक्यावर बेशिस्त वाहतुकीचा एक वेगळाच खेळ चालतो. कुणीही कुणाचं ऐकत नाही, दुचाकी वाहनचालकांवर तर पोलिसांचा वचकच राहिलेला नाही.

वाहतूक कोंडी झाली की काही सेवाभावी व्यक्ती स्वयंसेवकांसारखे मदतीला धावून येत पोलिसांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात. चार फाटा ते दोद्धेश्‍वर नाका हा मुख्य रस्ता दिवसेदिवस वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आहे. दाट लग्न तिथीमुळे या रस्त्यावर नेहमी वाहतूककोंडी होते. त्यामुळे सटाणा-नाशिक, सटाणा-ताहाराबाद, सटाणा-मालेगाव या रस्त्यावर दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.(Latest Marathi News)

वाहतूक कोंडीचे कारण

शहरातील चार फाटा येथे सिग्नल व्यवस्था नाही. येथे वाहतूक पोलिसही एखादाच असतो. परिणामी, बेशिस्त वाहने तसेच, खासगी वाहतूक करणारे रिक्षाचालक व सटाणा बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आलेले वाहनचालक‌ सटाणा बसस्थानकाच्या प्रवेशवद्वारासमोर वाहने उभी करतात. शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांमुळे येथे वाहतूक कोंडी होते.

मराठा हायस्कुलजवळ विद्यार्थ्यांसाठी उड्डाणपूल असला तरी दोद्धेश्‍वर नाका, ताहाराबाद रोड, नामपूर रोड, तहसील व पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्‍या नागरीकांमुळे दोधेश्‍वर नाक्यावरही प्रचंड वाहतूक कोंडी होते. येथे नियमित वाहतूक पोलिस नसतात.

दंडात्मक कारवाईची गरज

चार फाटा ते दोधेश्‍वर नाका या रस्त्याच्या दुतर्फा गटार ते गटार अतिक्रमण काढणे गरजेचे आहे. तसेच चार फाटा, बसस्थानक, दोधेश्‍वर नाका या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस तैनात हवा. जिजामाता उद्यान ते दोधेश्‍वर नाका या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर ऑनलाईन दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने लोक बेशिस्तपणे रस्त्यात वाहने उभी करणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT