Nashik Film City esakal
नाशिक

Nashik Film City: नाशिकमधील कलाकारांना सुगीचे दिवस; चित्रीकरणासाठी नाशिक बनले ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या नगरीत चित्रपटसृष्टी अद्याप साकारलेली नसताना ‘बिग बजेट’ हिंदी चित्रपट आणि मराठी मालिकांच्या चित्रीकरणाने नाशिककरांची ही उणीव काही प्रमाणात भरून काढली आहे.

प्रसिद्ध मराठी मालिकांसह हिंदी चित्रपटांच्या शूटिंगमुळे नाशिकमधील कलाकारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. तर निसर्ग संपदा आणि शूटिंगसाठी पोषक वातावरणामुळे नाशिक हे फेव्हरेट डेस्टिनेशन बनले आहे, असेच म्हणावे लागेल.

बॉलिवूड अर्थात मुंबई शहराला देशाची चित्रनगरी संबोधले जाते. या शहरात देशातील बिग बजेट चित्रपट बनवले तर जाताच, शिवाय सिने कलावंतांसाठी ही स्वप्ननगरी बनली आहे. मुंबई शहराला पर्याय म्हणून आता पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह उत्तर महाराष्ट्रातही शूटिंग मोठ्या प्रमाणात होत आहेत.

नाशिकमध्ये यापूर्वी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले. पण अलीकडील काळात नाशिकचे महत्त्व अधिक वाढले आहे. काही दिवसांपूर्वी किरण राव दिग्दर्शित हिंदी सिनेमाचे शूटिंग झाले. तर आताही जोया अख्तर दिग्दर्शित एका हिंदी चित्रपटाची शूटिंग गेल्या दोन महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात चालू आहे.

गोदावरी या मराठी सिनेमाचे चित्रीकरण नाशिकमध्ये झाले आहे. तसेच अनेक मालिकांचे चित्रीकरण शहराच्या अवतीभोवती होत आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने नुकतेच १००० भाग पूर्ण केले. त्याचे सुरवातीपासून ते आत्तापर्यंतचे सर्व चित्रीकरण नाशिकमध्ये मखमलाबाद या ठिकाणी झाले.

तसेच ‘लग्नाची वाइफ वेडिंगची बायकू’, ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांचे चित्रीकरण नाशिकमध्ये झाले आहे. आता दूरचित्रवाहिनीवर चालू असलेल्या ‘योगयोगेश्वर जय शंकर’ व ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मराठीत मालिकांचे चित्रीकरण नाशिकमध्ये चालू आहे.

''चित्रपट असतील किंवा मराठी मालिकांसाठी नाशिकमध्ये अत्यंत सुंदर वातावरण आहे. येथे कलाकार उपलब्ध आहेत. फक्त तांत्रिक बाजू सांभाळू शकतील अशा तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता आहे. या बाजूंवर आवश्यक तेवढे काम झाले तर नाशिकमध्ये छोटी फिल्मसिटी उभी राहण्यास फारसा वेळ लागणार नाही.'' - चिन्मय उदगीरकर, सिनेअभिनेते तथा दिग्दर्शक

चित्रीकरणाची ही आहेत कारणे

ऽ निसर्गाची भरपूर देणं नाशिकला लाभली आहे

ऽ नाशिकमध्ये दर्जेदार कलावंत, लेखक सहज उपलब्ध होऊ शकतात

ऽ नाशिकच्या कलाकारांमध्ये अभिनय प्रतिभा

ऽ धार्मिक, ऐतिहासिक स्थळांसह पर्यटनाची ठिकाणी नाशिकला मोठ्या प्रमाणात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT