Road widening and repair work in progress near Hotel Mirchi. esakal
नाशिक

Nashik Bus Fire Accident: हॉटेल मिरची चौकात रस्ता रुंदीकरणासह गतिरोधकाचे काम

विक्रांत मते

नाशिक : औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिरची चौकात झालेल्या अपघातानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने येथे सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे. या भागातील अतिक्रमण हटविल्यानंतर आता रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्तीसह गतिरोधक टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. (Nashik Bus Fire Accident Road widening speed breaker work at Hotel mirchi Chowk Nashik Latest Marathi News)

बस दुर्घटनेच्या पार्श्वभूमिवर चौकात आणि मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. झाडाच्या फांद्या छाटण्यात येऊन दृश्यमानता वाढवण्यात आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वच्छता करण्यात आली आहे. तपोवनकडून येणारे डावे वळण त्यामुळे मोठे करण्यात येत आहे.

तसेच, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी मंगळवारी (ता. ११) महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. मार्गातील ट्रान्सफॉर्मर हटविण्याबाबत अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच, ओव्हरहेड वायर अंडर ग्राउंड करण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. नगरनियोजन विभागाने अनधिकृत व अतिक्रमित बांधकामांचे डिमार्केशन करून दिल्यानंतर संबंधितांना नोटीस देण्यात आल्या आहेत.

त्यानंतर रस्त्याचे रुंदीकरणदेखील करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या चौकात स्पीडब्रेकर व डिव्हायडर बसवण्यात येणार आहे. त्याचे काम त्वरित सुरू होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. शहरात इतरही ठिकाणी रस्त्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पश्चिम विभागातील खडकाळी सिग्नल ते दूध बाजार रस्ता कामाची पाहणी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT