Donated cement pails at a cemetery in Nampur, second photo attractive colored stone ottos built around trees esakal
नाशिक

Nashik News : स्मशानभूमीचा होतोय कायापालट! नामपूरला लोकसहभागातून शेवटचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी धडपड

Nashik News : आगामी काळात पर्यावरणपूरक, आदर्श स्मशानभूमी म्हणून नामपूरची ओळख निर्माण व्हावी यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

प्रशांत बैरागी

नामपूर : मनुष्य धकाधकीच्या जीवनात ध्येय गाठून आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आयुष्यभर संघर्ष करत असतो, त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवटचा प्रवासही गोड व्हावा यासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना आणि लोकसहभागातून येथील स्मशानभूमीचा कायापालट होत आहे. आगामी काळात पर्यावरणपूरक, आदर्श स्मशानभूमी म्हणून नामपूरची ओळख निर्माण व्हावी यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. (Nashik cemetery getting makeover Nampur news)

साक्री रस्त्यालगत असणाऱ्या येथील स्मशानभूमीचे व्यवस्थापन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जाते. प्रवेशद्वाराला सामाजिक कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य दिवंगत भास्कर दगडू सावंत यांचे नाव दिले आहे. त्यांनी आयुष्यभर शहरातील हजारो कुटुंबांना अंत्यविधीबाबत मार्गदर्शन केले, त्यामुळे त्यांचा कार्याचा ग्रामपंचायत प्रशासनाने यथोचित गौरव केला आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. यासाठी येथील पर्यावरणप्रेमी नागरिक व वैकुंठधाम सेवा समितीच्या माध्यमातून स्मशानभूमीच्या आवारात गेल्या पाच वर्षांपूर्वी लावलेली पाच ते सहा फूट उंचीची लाख मोलाची रोपे लावल्याने वृक्ष चळवळ बहरली आहे. झाडांमुळे स्मशानभूमीचा परिसर हिरवागार झाला आहे.

गेल्या काही दोन वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते नारायण सावंत यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून ४० सिमेंट बाके देण्यात आली आहेत. तसेच स्मशानभूमीच्या आवारातील मोठ्या झाडांना आकर्षक रंगकाम केलेले दगडी ओटे बांधण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिकांची बसण्याची सोय झाली आहे.  (latest marathi news)

मृतदेह ठेवण्यासाठी दोन ओटे लोकसहभागातून बांधण्यात आली आहेत. बागलाण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष, शिक्षक संघाचे ज्येष्ठ नेते दिवंगत दौलतराव पगार यांच्या स्मरणार्थ पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. अस्थिकलश, अश्मचा दगड ठेवण्यासाठी लोखंडी पेटी बनविण्यात आली आहे. स्मशानभूमीच्या आवारात शासनाच्या कल्याणकारी योजनेतून काँक्रिटीकरण, गट्टू बसविणे आदी काम सुरू आहे.

"पंचक्रोशीतील गावांच्या स्मशानभूमीत असणाऱ्या चांगल्या बाबी नामपूरला असाव्यात यासाठी माझा प्रयत्न आहे. गोरगरिबांच्या अंत्यविधीसाठी आर्थिक मदत करणारे अनेक दाते शहरात आहेत. आगामी काळात स्मशानभूमीसाठी संरक्षक भिंत, साक्री रस्त्यालगत प्रवेशद्वार, नवीन वृक्षारोपण, कायमस्वरूपी कर्मचारी, शवदाहिनीची व्यवस्था आदी कामांसाठी पाठपुरावा सुरू आहे."- नारायण सावंत, सामाजिक कार्यकर्ते, नामपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case: 'गाेपाल बदने, प्रशांत बनकरच्‍या पोलिस कोठडीत वाढ'; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायालयात नेमकं काय घडलं?

Sweet Corn Appe Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा कुरकुरीत स्वीटकॉर्न अप्पे, सोपी आहे रेसिपी

आता नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून! महापालिका निवडणुकीत 9 लाख तर झेडपीसाठी उमेदवारांना करता येणार 7.50 लाखाचा खर्च; पंचायत समितीसाठी 5.25 लाखांची मर्यादा

‘रन फॉर युनिटी’मध्ये आज सगळेच पोलिस धावणार! प्रत्येक पोलिस ठाण्याला फोटो, व्हिडिओ अपलोड करण्याची घातली अट; पोलिसांकडून टी-शर्ट, फलकांची खरेदी

आजचे राशिभविष्य - 31 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT