Truck (file photo) esakal
नाशिक

Nashik City Transport : अवजड वाहन वाहतुकीत बदलास महिनाभराची मुदतवाढ; सुधारित अधिसूचना 3 जूनपर्यंत बदल लागू

Nashik News : अवजड वाहनांमुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी, अपघातांच्या घटनांच्‍या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी निर्बंध घातले जात असतात.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अवजड वाहनांमुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी, अपघातांच्या घटनांच्‍या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेतर्फे वेळोवेळी निर्बंध घातले जात असतात. त्‍यानुसार प्रायोगिक तत्त्‍वावर केलेल्‍या बदलास महिनाभराची मुदतवाढ देण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. त्‍यानुसार आता ३ जूनपर्यंत अवजड वाहनांच्‍या वाहतुकीसाठी बदल कायम राहणार आहे. (Nashik City Transport)

यापूर्वी प्रायोगिक तत्त्‍वावर दहा दिवसांसाठी अवजड वाहनांच्‍या वाहतूक मार्गात बदल केला होता. ही मुदत शनिवारी (ता. ४) संपत असतानाच पोलिस उपायुक्‍त चंद्रकांत खांडवी यांनी एक महिन्‍याची मुदतवाढ देण्याचा निर्णय जारी केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिक-पुणे महामार्गाकडे जाणारे अवजड वाहने शहरातील विविध मार्गातून होत पुढे जातात.

अवजड वाहनांमुळे द्वारका चौकात होणारी वाहतूक कोंडीची समस्‍या लक्षात घेता, यापूर्वी आदेश जारी करताना रात्री ही वाहतूक फेम सिग्‍नल, श्रीश्री रविशंकर मार्गाने वडाळा, पाथर्डी गाव, पाथर्डी फाटा मार्गे मुंबईकडे वळविली होती. परंतु या मार्गात वाहतुकीची समस्‍या तसेच अपघाताच्‍या प्रमाणातही वाढ होत असल्‍याने नागरिकांकडून तक्रारी वाढत होत्‍या. (latest marathi news)

त्‍यानुसार वाहतूक शाखेने प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहनांसाठी वाहतूक मार्गात येत्‍या ४ मेपर्यंत बदल लागू केला होता. आता हा बदल पुढील महिनाभरासाठी लागू राहणार आहे.

असे आहेत बदल...

* पुण्याकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक आता काठे गल्‍ली सिग्‍नल, द्वारका सर्कल येथून डावीकडे वळून रॅम्‍पने मुंबईकडे जाईल.

* मुंबईकडून पुण्याकडे जाणारी अवजड वाहतूक पाथर्डी फाटा, इंदिरानगर, वडाळा गाव, डीजीपीनगर, सम्राट सिग्‍नल मार्गे नाशिकरोडच्‍या दिशेने रवाना होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK चा जुना भिडू आता झाला 'नाईट रायडर', IPL 2026 साठी कोलकाता संघाची मोठी घोषणा

India Post Bank Bharti: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत मेगा भरती! ३०९ जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, अटी आणि शेवटची तारीख

मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेचा मालिकेतून नाही गाण्यातून कमबॅक ! 'राजा राजा' गाण्याचा टीझर रिलीज

Latest Marathi Breaking News Live : अंबड नगरपरिषदेत भाजप स्वबळावर लढणार: नारायण कुचे

Hinjewadi Pollution : हिंजवडी, वाकड भागांत प्रदूषणाचा ‘व्हायरस’; रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा!

SCROLL FOR NEXT