illness esakal
नाशिक

Nashik Weather Update: वातावरणात पुन्‍हा गारवा, साथीच्‍या आजारांत वाढ! राज्‍यात नाशिकचे किमान तापमान नीचांकी

Nashik News : वातावरणात सातत्‍याने होत असलेल्‍या बदलांमुळे साथीच्‍या आजारांमध्ये वाढ झालेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वातावरणात सातत्‍याने होत असलेल्‍या बदलांमुळे साथीच्‍या आजारांमध्ये वाढ झालेली आहे. गेल्‍या दोन दिवसांपासून वातावरणात गारवा टिकून राहात असल्‍याने पारा घसरला आहे. मंगळवारी (ता.५) नाशिकचे किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस नोंदविले असून, हे राज्‍यातील इतर शहरांच्‍या तुलनेत नीचांकी तापमान राहिले. तर निफाडचे तापमान ६.६ अंश नोंदविले गेले आहे. (Nashik Cold weather again increase in epidemics Minimum temperature of city lowest in state marathi news)

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उन्‍हाच्‍या तप्त झळा जाणवू लागल्या असताना, तापमानातही लक्षणीय वाढ झालेली होती. अगदी उन्‍हाळ्याच्‍या हंगामाप्रमाणे दिवसा उन्‍हाचा तडाखा जाणवू लागला होता. परंतु उत्तर भारतातील वातावरणीय बदलांचा परिणाम झाल्‍याने त्‍यानंतर काही दिवसांतच पुन्‍हा वातावरणात गारवा निर्माण झाला.

गेल्‍या आठवड्याभरापासून पुन्‍हा पारा चढता होता. मात्र गेल्‍या दोन दिवसांपासून सायंकाळच्‍या वेळी वातावरणात गार वारे वाहत असल्‍याने तापमानात घसरण झाली आहे. पुढील आणखी तीन-चार दिवस वातावरणात गारवा कायम राहणार असल्‍याचा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे. दरम्‍यान वातावरणातील या बदलांमुळे साथीचे आजार बळावले आहेत. (Latest Marathi News)

सर्दी, खोकल्‍यासह अंगदुखी, तापाची तक्रार असलेल्या रु‍ग्‍णांची क्‍लिनिक, रुग्‍णालयांमध्ये गर्दी वाढल्‍याचे बघायला मिळते आहे. वातावरणातील बदल आरोग्‍यावर प्रतिकूल परिणाम करणारे असून, सद्यःस्‍थितीत आहारातील पथ्य पाळण्यासह आरोग्‍याची काळजी घेण्याचा सल्‍ला तज्‍ज्ञांकडून दिला जात आहे.

दोन दिवसांत दहा अंशांपर्यंत घसरण

नुकताच रविवारी (ता.३) निफाडचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदविले होते. अवघ्या दोन दिवसांत मंगळवारी ६.६ अंश सेल्सिअस इतक्‍या किमान तापमानाची निफाडला नोंद झालेली आहे. तर नाशिकचे किमान तापमान रविवारी १८.७ अंश सेल्सिअस होते. ते घसरून मंगळवारी १०.८ अंश सेल्सिअसपर्यंत खालावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT