corona ward.jpg 
नाशिक

आनंदवार्ता! अखेर नाशिककरांनी करून दाखवलचं; कोरोनामुक्तीत राज्यात आघाडीवर

विक्रांत मते

नाशिक : गेल्या महिन्यापर्यंत वर असलेल्या कोरोना प्रादुर्भावाचा आलेख ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून खालावला. कोरोना बाधित बरे होण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याने राज्यात नाशिक अव्वल ठरताना दिसत आहे. 

राज्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ टक्के

ग्रामिण भागात ९३.४४ टक्के तर शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ टक्के आहे. 
एप्रिल महिन्यात शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. वडाळागाव, पंचवटी विभागातील फुले नगर, अंबड लिंकरोडवरील संजीव नगर, सातपूर कॉलनी, सिडको हा भाग हॉटस्पॉट ठरला. मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरात दररोज पन्नासच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर मात्र कोरोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीमुळे मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिकरेड झोन मध्ये आले. जुलै ते सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोना बाधितांचा आलेख उंचावत राहिला. ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र आलेख खालावू लागला. 

बरे होण्यात शहर आघाडीवर 

जून महिन्यात नाशिकमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर ४२.६० टक्के होता. जुलै महिन्यात त्यात वाढ होऊन रिकव्हरी रेट हा ७१ टक्क्यांपर्यंत पोहचला होता. ऑगस्ट महिन्यात हा दर ८४ टक्क्यांवर पोहचला होता. सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात सर्वाधिक ९१.०५ टक्के तर राज्याचा रिकव्हरी रेट ७५.०९ टक्के एवढा होता. ऑक्टोंबर महिन्यात रिकव्हरी रेटमध्ये आणखी वाढ झाली आहे. जिल्ह्यात ९३ हजार ९९ करोनाबाधितांपैकी ८६ हजार ९९४ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. चार हजार ४४२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

शहरात २ हजार ५६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्याच्या तुलनेत नाशिक शहर व जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असून जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.४४ तर शहरात ९४.४५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८९.६९ आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT