Cotton News
Cotton News esakal
नाशिक

Nashik Cotton Crop Crisis: ‘पांढरे सोने' काळवंडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत! क्विटंलला 2 ते 3 हजार रुपयांची घसरण

दीपक देशमुख

झोडगे : खानदेशच्या शेतकऱ्यांचे वैभव म्हणून कापसाला ओळखले जाते. दुष्काळी परिस्थितीत व निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे.

त्यातच, गेल्या काही वर्षांच्या तुलनेने बाजारभाव क्विटंलमागे दोन ते तीन हजाराने घटल्याने माळमाथ्यासह खानदेश पट्ट्यातील अर्थकारण बिघडले आहे. ‘पांढरे सोने' काळवंडल्याने परिसरातील अर्थचक्र मंदावले आहे. (Nashik Cotton Crop Crisis Farmers in financial trouble drop of 2 to 3 thousand rupees per quintal)

नाशिक, जळगाव, धुळे जिल्ह्यात कापूस हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. कांदा व फळशेतीनंतर केळी व कापूस उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.

सुरवातीचा काही काळ वगळता गेल्यावर्षी भाववाढीच्या अपेक्षेने घरात थप्पी मारलेल्या ‘पांढऱ्या सोन्याला' समाधानकारक भाव मिळाला नाही. गेल्यावर्षी बहुतांशी कापूस ७ हजार रुपये क्विटंलच्या आसपास भावाने विकला गेला.

तरीही मोठ्या अपेक्षेने यंदाच्या हंगामात कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. लागवडीनंतर पाऊस बेपत्ता झाला. पिकांची वाढ खुंटली. फूल व बोंड वाढीवर मोठा परिणाम झाला.

चार ते सहा फुटांची वाढ होणारे पीक दीड ते दोन फुटांपर्यंत वाढल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. एकरी आठ ते दहा क्विटंलचे उत्पादन दोन क्विटंलच्या आत थांबले.

यंदा कापसाचे अत्यल्प उत्पन्न असूनही त्याला क्विटंलला सात हजारांच्या आत भाव मिळत आहे. आधीच उत्पादन कमी त्यात, भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

माळमाथा परिसरात सर्वाधिक कापूस लागवड करण्यात आली होती. लागवड होताच, पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांची वाढ खुंटून उत्पादन घटले.

सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन क्विटंल आणि कोरडवाहू शेतजमिनीत शेतकऱ्यांना एकरात एक ते दीड क्विटंलचा उतारा मिळाला. कर्ज काढून कापूस लागवडीनंतर मिळालेल्या उत्पन्नातून खर्च पदरात पडला नाही.

ग्रामीण भागातील खेड्यात मागील काही दिवसांपासून खासगी व्यापारी कापूस खरेदी करीत आहेत. भाव दररोज बदलत आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात कापसाची विक्री केली.

कापसाचे एकराचे अर्थकारण (आकडे रुपयांमध्ये दर्शवितात)

० शेती नांगरणी- दीड हजार

० रोटाव्हेटर- एक हजार

० बियाणे- दोन हजार

० लागवड, निंदणी, कोळपणी- साडेतीन हजार

० रासायनिक खते- साडेतीन हजार

० फवारणी औषधे व मजुरी- तीन हजार

० कापूस वेचणी- एक हजार ८००

० एकूण खर्च- सोळा हजार ३००

० दोन क्विटंलचे अंदाजे उत्पन्न- चौदा हजार

( पाणी भरणे व कापूस काढणे वेगळा खर्च)

"गेल्यावर्षी सुरवातीला १० हजार रुपये क्विटंल असा भाव मिळाला. भाव वाढेल या आशेने घरात कापूस साठवला होता. मात्र भावात मोठी घसरण झाल्याने व साठवलेल्या कापसाचे वजन घटल्याने मिळेल, त्या भावात कापूस विक्री करावा लागला. यंदा बाजारभाव तेजीत राहातील या आशेने मोठ्या प्रमाणावर खर्च केला. मात्र, सुरवातीपासून पावसाने खंड दिल्याने उत्पादनात घट झाली. कापसाला मिळत असलेला बाजारभाव शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे."

- शेखर देसले, कापूस उत्पादक, झोडगे

"निर्यातीत घट झाल्याने व सरकीचे भाव कमी झाल्याने बाजारभावात घसरण झाली. यंदा कापसाचे उत्पादन घटले. अवकाळी पावसाने कापसाची गुणवत्ता घसरली. गुजरातमधील कापूस मिलचे बाजारभाव दररोज बदलत असल्याने व्यवसायात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत."- अमित बाविस्कर, व्यापारी, झोडगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT