nashik 2.jpg 
नाशिक

प्रदूषित शहरात नाशिकचाही समावेश; आयआयटी टीम करणार तपासणी

सतिश निकुंभ

सातपूर (नाशिक) : मागील काही वर्षांत औद्योगिकसह रहिवासी क्षेत्रातील वाहनांसह इतर प्रदूषणामुळे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, सोलापूरनंतर नाशिकचाही प्रदूषित शहरात समावेश झाला. यामुळे केंद्र व राज्य सरकारने शहरातील हवेच्या गुणवत्ता तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. आयआयटीचे मुंबईप्रमुख वीरेन शेठी यांची टीम नाशिकमध्ये मंगळवारी (ता. ५) दाखल झाली असून, पुढील दहा दिवस शहरातील विविध भागांत हवेची गुणवत्ता तपासणी करणार आहे. 

प्रदूषित शहरात नाशिकची गणना

सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी रुपये खर्च करून नाशिकच्या विविध भागांत हवा व पाण्याची रोज तपासणी करणारी यंत्रणा उभी केली होती. सध्या ही यंत्रणा काही खासगी ठेकेदारांतर्फे चालविली जाते. नाशिकने नैसर्गिक वातावरण जपल्याचे वाटत होते, पण काही वर्षांत औद्योगिकसह शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात मोठी बांधकामे व विविध प्रकल्प उभे राहिले. पर्यटनाचा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असलेल्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावर मोठी भंगार गुदामे तयार झाली असून, रात्री घातक केमिकलयुक्त पदार्थ व प्लॅस्टिक जाळले जाते. औद्योगिक वसाहतीतील प्लेटिंग उद्योगातून निघणारे केमिकलयुक्त पाणी, फ्राफाइडसारख्या मोठ्या कंपन्यांतून कार्बनचे धूलिकण बाहेर पडत असल्याने नाशिकचे नैसर्गिक वातावरण व हवा प्रदूषित होत आहे. 

दहा दिवस आयआयटी करणार मानिटरिंग 
 
नाशिकचाही समावेश प्रदूषित हवेचे शहर म्हणून गणना झाली आहे. याबाबत राज्य व केंद्राने दखल घेऊन नाशिकची हवा तपासणीचा निर्णय घेतला. त्यासाठी आयआयटी मुंबईचे प्रमुख वीरेन शेठी टीम घेऊन नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. सकाळी त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात वरिष्ठ प्रवीण जोशी, एसआरओ अमर दुर्गुळे व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. महापालिका अधिकाऱ्यांकडून शहरातील वर्दळीच्या स्पॉटबाबत माहिती घेऊन पुढील दहा दिवस हवेची गुणवत्ता तपासणी करणार आहेत. 

नाशिकमधील एअर कन्व्हेशनचे प्रमाण कमी 

एमपीसीबीतर्फे औद्योगिक वसाहतीत व्हीआयपी इंडस्ट्रीज, केटीएचएम कॉलेज, धुमाळ पॉइंट व एक फिरते अशी ठेकेदाराची चार पथके तपासणी करतात. नियमाप्रमाणे शंभर एनएमक्यू पॉइंट एअर कन्व्हेशनच्या आत आकडा असेल, तर त्या शहरातील हवा शुद्ध मानली जाते. सध्या 
लॉकडाउननंतर नाशिकमधील एअर कन्व्हेशनचे प्रमाण कमी झाल्याचा दावा एमपीसीबी मंडळाने केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT