Ganja seized from Wadala village. Along with the team of Unit One of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : वडाळ्यातून 28 किलो गांजाचा साठा जप्त! युनिट एकची कामगिरी; साठेबाजाला अटक

Crime News : याप्रकरणी साठा करणाऱ्यास अटक करण्यात आली असून इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : वडाळा गावातील म्हाडाच्या बिल्डिंगमध्‌ये पाचव्या मजल्यावर साठा करून ठेवण्यात आलेला सुमारे २८ किलोंचा गांजा जप्त करण्यात आला आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जप्त केलेला गांजा शिरपूर मार्गे (जि. धुळे) नाशिकमध्ये आणण्यात आल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी साठा करणाऱ्यास अटक करण्यात आली असून इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime 28 kg of ganja stock seized from Wadala)

शाहरुख शहा रफिक शहा (२९, रा. म्हाडा वसाहत बिल्डिंग, वडाळागाव, मूळ रा. मेहबूबनगर, वडाळागाव, नाशिक) असे गांजाचा साठा करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार मुख्तार शेख यांना, वडाळ्यातील म्हाडा बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर गांजाचा साठा असल्याची खबर मिळाली होती.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या सूचनेने युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या निर्देशानुसार युनिट एकच्या पथकाने मंगळवारी (ता. २८) रात्री शहा याच्या घरात छापा टाकून झडती घेतली.

तेव्हा पथकाच्या हाती ४ लाख २१ हजार ७२५ रुपयांचा ओलसर २८.११५ किलो गांजा हाती लागला. यावेळी पोलिसांनी संशयिताचा १० हजारांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. असून शहा यास अटक करण्यात आली असून, अधिक चाैकशी सुरु आहे. इंदिरानगर पाेलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक बी. डी. सोनार करीत आहेत. (latest marathi news)

सदरची कामगिरी युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कडे, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुरेश माळोदे, रमेश कोळी, महेश साळुंके,देविदास ठाकरे, नाझीम खान, धनंजय शिंदे, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, राजेश राठोड, समाधान राठोड यांनी केली.

वडाळा ‘नशेडी’ केंद्र

गेल्या काही वर्षांमध्ये वडाळागाव हे अंमली पदार्थांचा अड्डा बदले आहे. गांजा, एमडी ड्रग्जस् याठिकाणी विक्री होत असते. याप्रकरणी गुन्हेही दाखल आहेत. परंतु तरीही रॅकेट उदध्वस्त होऊ शकलेले नाही. याठिकाणी गांजाची पुडी ४० रुपयांना संशयितांना विकली जाते.

तर याच भागातून एमडीचीही विक्री चालायची. गेल्या वर्षी याच परिसरातून छोट्या भाभीला एमडी ड्रग्जस्‌ विक्री केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतरही या परिसरात एमडी ड्रग्स्‌, गांजाची सर्रासपणे विक्री होत असल्याचे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT