Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : आयुक्तालय हद्दीत 612 टवाळखोरांविरोधात कारवाई!

Nashik News : आगामी लोकसभा निवडणूक व शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय हददीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आगामी लोकसभा निवडणूक व शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय हददीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये आयुक्तालय हद्दीतील ६१२ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. (Nashik Crime Action taken against 612 criminals in Commissionerate area)

पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये शहरात सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांवर टीकेची झोडही उठली आहे.

परिमंडळ एकमधील आडगाव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २९० टवाळखोर आणि तर, परिमंडळ दोनमधील अंबड, सातपूर, इंदिरानगर.

उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यासह चुंचाळे पोलीस चौकी या हद्दीत ३२२ टवाळखोर अशा ६१२ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अचानक राबविलेल्या या कारवाईमुळे रात्रीच्यावेळी उपद्रव माजविणार्यांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shevgaon politics: 'शेवगावातील मातब्बरांचा भाजपत प्रवेश'; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडी, राजळेंसोबत जाण्याचा निर्णय

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पोलीस हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार

CM Yogi Adityanath: सीएम योगींनी आदिवासी समाजाला दिली दिवाळी भेट, या घरी दिप प्रज्वलन करून साजरा केला सण

Solapur News: 'धोत्री येथे आढळला साडेसात फुटी अजगर'; नाग फाउंडेशनच्या रेस्क्यू पथकाने पकडून अधिवासात केले मुक्त

Cyclone Alert India : पुढील तीन दिवस देशभरात मुसळधार पावसाची शक्यता; 'या' राज्यांत चक्रीवादळ तांडव माजवणार, IMD कडून सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT