Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : सराईत चौघे जिल्ह्यातून हद्दपार; उपायुक्त मोनिका राऊत यांचे आदेश

Nashik Crime : चोरी, दरोडा व गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इंदिरानगर, अंबडमधील चार सराईत गुन्हेगारांना शहर-जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : चोरी, दरोडा व गंभीर गुन्हे दाखल असलेल्या इंदिरानगर, अंबडमधील चार सराईत गुन्हेगारांना शहर-जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. एप्रिल २०२४ पर्यंत परिमंडळ दोनमधील १८ जणांवर हद्दपारीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून चौघांना एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले. तर, १८ जणांविरुद्ध मोकांतर्गत कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. ( four accused deported from district )

नवाज आकील शेख (२५, रा. गरीब नवाज कॉलनी, वडाळा गाव), किरण ऊर्फ बिटवा रमेश मल्हारी (२९, रा. म्हाडा वसाहत, वडाळा गाव) या सराईत गुन्हेगारांना इंदिरानगर हद्दीतून तर, सनी ऊर्फ माँटी रमेश दळवी (३१, रा. अभिनव रो. हाउस, पाण्याच्या टाकीजवळ, कामटवाडे), पवन विनायक वायाळ (२६, रा. नेहरू चौक, सावतानगर) अशी अंबड हद्दीतून तडिपार केलेल्या दोघांची नावे आहेत.

मारहाण करून जबरी चोरी करणे, दरोड्याची पूर्व तयारी करणे, घरात घुसून मारहाण, दुखापत करणे, घरफोडी, चोरी करणे, आदेशाचे उल्लंघन करणे, घातक हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे संशयितांवर दाखल आहेत. यामुळे, सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोचू नये, यासाठी परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी चौघांना शहर-जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

कारवाई सुरूच राहणार

आगामी सण, उत्सव तसेच लोकसभा निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी परिमंडळ दोनमधील सराईत गुन्हेगारांच्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली जात आहेत. अशा गुन्हेगारांविरोधात हद्दपार, एमपीडीएअन्वये स्थानबद्धता यासारखी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरूच राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council decision : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना मोदी सरकारकडून 'GOOD NEWS' ; दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त होणार

No GST on Insurance: आरोग्य व जीवन विम्यावर शून्य GST; तुमच्या पॉलिसीचा हप्ता किती कमी होणार?

GST tax slabs : 'जीएसटी' बैठकीत मोठा निर्णय ; आता फक्त दोनच टॅक्स स्लॅब असणार

Uday Samant: लंडनमध्ये ‘मराठी भाषा केंद्र’! महाराष्ट्र मंडळाची इमारत ताब्यात घेणार

Video : दादर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये अग्नितांडव, १० ते १२ दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT