Crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : दीड महिन्यात साडेतीन कोटींचा अवैध मद्यसाठा, गुटखा जप्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्याच्या आचारसंहितेच्या काळात ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात जोरदार कारवाई केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्याच्या आचारसंहितेच्या काळात ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात जोरदार कारवाई केली आहे. अवैध मद्य आणि प्रतिबंधित गुटखा, असा सुमारे तीन कोटी ५३ लाख ५२ हजार २६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत सुमारे तीन हजार टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. (illegal liquor stock worth three and half crore and Gutkha seized)

शहर-जिल्ह्यातून ३२ सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. ग्रामीण पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध व्यावसायिक व सराईत गुन्हेगारांचे मात्र धाबे दणाणले आहे. लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता १६ मार्चला जाहीर झाली. त्यानंतर नाशिक शहरासह ग्रामीण पोलिसांकडूनही अवैध धंद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू करण्यात आली.

तसेच निवडणूक काळात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून कडेकोट नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात धडक कारवाईची मोहीम राबविली. अवैध दारू व प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक, साठा व विक्री करणाऱ्यांवरही जोरदार कारवाई करण्यात आली.

ग्रामीण पोलिसांनी गेल्या दीड महिन्यामध्ये अवैध मद्याविरोधात एक हजार १२६ गुन्हे दाखल करीत ८७ हजार ४४० लिटर देशी, विदेशी व गावठी दारू जप्त केली. तसेच अवैध गुटख्याप्रकरणी ७८ गुन्हे दाखल केले आहेत. (Latest Marathi News)

तसेच, जिल्ह्यातील परवानाधारक ७५१ शस्त्रधारकांकडील पिस्तूलही जमा करण्यात आलेल्या आहेत. तसेच आठ हजार ५४८ चालकांविरोधात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करीत ७५ लाख ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

३२ सराईतांची तडीपारी

जिल्ह्यातील ३२ सराईत गुन्हेगार तडीपार करण्यात आले असून, ५० सराईत गुन्हेगारांविरोधातील तडीपारीचे प्रस्तावांवर लवकरच कारवाई होणार आहे. तसेच चार सराईत गुंडांविरोधात एमपीडीएअन्यवे त्यांच्यावर स्थानबद्धतेचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिसांनी २१ गुन्हे दाखल करून पाच देशी कट्टे, १५ तलवारी, आठ कोयते-चॉपर, फायटर अशी शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच फरारी असलेले रेकॉर्डवरील ५७ संशयित आरोपींची पोलिसांनी धरपकड केली आहे.

टवाळखोरांवर बडगा

जिल्ह्यातील ४० पोलिस ठाणेनिहाय दोन हजार ९७३ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ४० पोलिस ठाणेनिहाय एक हजार ६६५ जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT