Cash recovered from the suspects while solving the crime of looting the merchant's cash. along with the team of Unit One of the City Crime Branch. esakal
नाशिक

Nashik Crime News : व्यापाऱ्याची लुटमार करणारे गजाआड! 48 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर यश

Crime News : अखेर ४८ तासात गुन्ह्याची उकल करीत संशयितांकडून सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गेल्या आठवड्यात पेठरोडवर दुकानातील रोकड घेऊन निघालेल्या व्यक्तीला दुचाकीवरून असलेल्या तिघांनी अडविले आणि मारहाण करून त्यांच्याकडील १७ लाखांचा रोकड हिसकावून नेल्याप्रकरणी मुख्य संशयितासह ‘टीप’ देणाऱ्या दोघांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे.

गुन्हा घडल्यापासून युनिट एकचे पथक गुन्ह्याची उकल करण्यासाठी प्रयत्नशिल होते. अखेर ४८ तासात गुन्ह्याची उकल करीत संशयितांकडून सुमारे १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Nashik Crime jailed robbed merchant Success after 48 hours news)

दिलीप छाजेड यांच्या फिर्यादीनुसार, शरदचंद्र पवार मार्केट आवारातील व्यापारी पवन लोढा यांच्याकडे छाजेड हे कामाल आहेत. रात्री दुकान बंद केल्यानंतर दुकानातील रोकड घेऊन ते मालक लोढा यांच्या घरी पेठरोडने जातात. गेल्या बुधवारी (ता. १७) रात्री आठ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे १७ लाखांची रोकड घेऊन मोपेडने जात होते.

त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी त्यांना आरटीओ ऑफिसजवळील वजन काट्याजवळ अडविले आणि मारहाण करून त्यांच्याकडील रोकडच बॅग हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी म्हसरुळ पोलिसात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास शहर गुन्हेशाखेचे युनिटएकचे पथक करीत होते. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करीत असताना अंमलदार विलास चारोस्कर, राजेश राठोड यांना मुख्य संशयित पेठरोड परिसरातील शनि मंदिराजवळ येणार असल्याची खबर मिळाली.

त्यानुसार सापळा रचून सराईत गुन्हेगार संदेश सुधाकर पगारे उर्फ काळ्या यास अटक केली. त्याच्याकडून दुचाकी व ९ लाख ४९ हजार ८३० रुपयांची रोकड जप्त केली. तर, अंमलदार अप्पा पानवळ यांनी फुलेनगरमधून संशयित अतुल सुरज सय्यद, असलम गफुर सय्यद या दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघे संशयित पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  (latest marathi news)

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, पथकाचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षख हेमंत तोडकर, गजानन इंगळे, रवींद्र बागुल, वसंत पांडव, सुरेश माळोदे, सुगन साबरे, शरद सोनवणे, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, प्रदीक म्हसदे, धनंजय शिंदे, महेश साळुंके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, अप्पा पानवळ, राहुल पालखेडे, अनुजा येलवे, किरण शिरसाठ, नाझीम पठाण आदींनी बजावली.

संशयितांनी केली रेकी

अटक केलेल्या संशयितांपैकी अतुल सय्यद, असलम सय्यद हे दोघे लोढा यांच्याकडे कामाला होते. त्यामुळे त्यांची रोजची रोकड कधी नेली जाते याचा त्यांना माहिती होती. या दोघांनी संशयित संदेश पगारे, सागर पगारे, वैभव गांगुर्डे यांना सदरची माहिती दिली. त्यानुसार संशयितांनी रेकीही केली. त्यानुसार बुधवारी (ता.१७) संशयित सय्यद यांनी छाजेड रोकड घेऊन निघाल्याची टीप दिली. त्यानंतर तिघा संशयितांनी छाजेड यांचा पाठलाग करीत त्यांची लुटमार केली.

कसून तपासाचे फलित

पोलिसांनी घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच, लोढा यांच्या दुकानातील फुटेज मिळवून त्याचा अभ्यास केला असता संशयित अतुल व असलम सय्यद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर संशयितांनी संदेश पगारे याचा कटात समावेश असल्याचे सांगितले. त्यानुसार संदेशला सापळा रचून अटक केली. संशयितांकडून रोकड, दोन दुचाक्या, मोबाईल असा १४ लाख ३२ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 1st ODI Live: भारतीय संघाला 'तोट्या'त टाकणारा निर्णय! षटकांची संख्या झाली कमी, ऑस्ट्रेलियाचा फायदा...

Gokul Milk Politics : हसन मुश्रीफांनी डिबेंचर्सवरून केलेल्या वक्तव्याला महाडिक गटाकडून उत्तर

Pre-Diwali Beauty: दिवाळीपूर्वी घरच्या घरी गोल्ड फेशियल केल्यास चेहरा दिसेल चमकदार

Nanded : लग्न ठरवायला जाताना अपघात, सॉफ्टवेअर इंजिनिअरसह बहिणीचा मृत्यू; अनेकजण जखमी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंनी मतदार यादीवरून सरकारला घेरलं

SCROLL FOR NEXT