Nashik News esakal
नाशिक

Nashik News : अबब! ओझरला 90 हजार रुपये किमतीच्या डुकरांची चोरी

सकाळ वृत्तसेवा

ओझर : आजपर्यंत सोनसाखळी चोर, दरोडा, मोटारसायकल चोर, मोबाईल चोरी, दानपेटी चोरी पाकीटमार अशा प्रकारच्या चोऱ्या ऐकीवात आहे. मात्र डुकरांचीही चोरी होऊ लागली आहे. असाच प्रकार ओझरला घडत असून, या अजब प्रकाराने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

ओझर येथील कचरा डेपोत (कचरापट्टी) असलेल्या एका जणाच्या मालकीच्या अनेक पाळीव डुकरांपैकी ९० हजार रुपये किमतीचे १७ डुक्कर चोरट्याने चोरून नेले असल्याची घटना घडली आहे.

विकी किशोर गेचंद (रा. महाराणा प्रताप चौक, ओझर) यांच्यासह त्यांचे कुटुंबीयांचा डुक्कर पाळण्याचा व्यवसाय असून, त्यांचे मालकीचे पाळीव डुक्कर ओझर कचरा डेपो वट तेथे असलेल्या शौचालयाच्या आजूबाजूला दिवसभर व रात्रीसुद्धा असतात.

हेही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

शनिवारी रात्री दीड ते पहाटे पाचच्या दरम्यान त्या डुकरापैकी पांढऱ्या रंगाचे सहा महिने गटातील लहान-मोठे १७ डुक्कर (अंदाजे किंमत ९० हजार रुपये) कमी झाले असल्याचे पहाटे पाचला गेचंद यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ओझरसह परिसरात शोध घेतला. परंतु डुक्करे मिळून आले नाही म्हणून १७ डुक्करे चोरट्यांनी चोरून नेले असल्याची तक्रार विकी गेचंद यांनी रविवारी नोंदविल्यावरून ओझर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार बापू आहेर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT