Upper Superintendent of Police Aniket Bharti, Assistant Superintendent of Police Tegbir Singh Sandhu, etc. esakal
नाशिक

Nashik Crime News : बहिणीला पळवून नेल्याने खून; इब्राहिम गांजावाला खूनप्रकरणी दोघांना अटक

Nashik Crime इब्राहिम गांजावालाचा खून बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तिच्या भावाने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने केल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील ओवाडी नाला भागातील नम्रा मशिदीजवळ ५ फेब्रुवारीला गोळी घालून इब्राहिम गांजावालाचा खून बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून तिच्या भावाने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने केल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे.

या खून प्रकरणी रमजानपुरा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने आणखी दोन संशयितांना अटक केली. अटक केलेल्यांची संख्या आता चार झाली आहे. (Nashik Crime news Two arrested in connection of murder )

संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल, चार मोबाईल व दुचाकी जप्त केल्याचे अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू यांनी बुधवारी (ता.१४) येथे पत्रकार परिषदेत सांगितले. नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद हॉलमध्ये रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

येथील ओवाडी नाला भागात इब्राहिम शेख इस्माईल ऊर्फ इब्राहिम गांजावाला (वय २९, रा. नागछाप झोपडपट्टी) या तरुणाचा गोळी झाडून खून झाला होता. खुनानंतर अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी युसूफ छिछडा, त्याचा मुलगा रिहान युसूफ या पिता-पुत्रांना अटक केली होती. बहिणीला पळवून नेण्याचा राग डोक्यात असल्याने रिहानने इब्राहिम समवेत नम्रा मशिदकडे जाऊन डोक्यात गोळी घालून त्याचा खून केला.

दोघांच्या अटकेनंतर रिहानकडून मिळालेली माहिती व तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारावर पोलिसांनी रिहानला गावठी पिस्तूल पुरविणारा शेख शहजाद रफीक (२३, रा. जाफरनगर, ह. मु. सिल्लोड) व त्याला घटनास्थळावरून पळून जाण्यास मदत करणारा समीर शेख शब्बीर (१९, रा. निहालनगर) या दोघांना अटक केली.

दोघा संशयितांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. संशयितांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली गावठी पिस्तूल, चार मोबाईल व दुचाकी जप्त केली.

श्री. भारती, सहाय्यक अधिक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक संदीप पाटील, रमजानपुरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक डी. जी. बडगुजर, पोलिस शिपाई नरेंद्र कोळी, देवा गोविंद, चेतन सवंत्सकर व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी मयत इब्राहिमचे वडील इस्माईल खान यांच्या तक्रारीवरून रमजानपुरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT