cattle trafficking File photo esakal
नाशिक

Nashik Crime News: वडाळागावात गोवंशीय जनावरांची सुटका! इंदिरानगर पोलिसांची कारवाई; 870 किलो गोमांस जप्त

Crime News : इंदिरानगर पोलिसांनी छापा टाकून चार गोवंशीय जनावरांची सुटका केली. तसेच, ८७० किलो गोमांस जप्त करीत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : वडाळागाव शिवारातील भंगाराच्या गोदामात गोवंश जनावरे व मांस असल्याची खबर मिळताच, इंदिरानगर पोलिसांनी छापा टाकून चार गोवंशीय जनावरांची सुटका केली. तसेच, ८७० किलो गोमांस जप्त करीत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rescue of cattle animals in Wadalagaon)

इंदिरानगर पोलिस ठाण्याचे अंमलदार सागर परदेशी यांच्या फिर्यादीनुसार, वडाळागाव शिवारातील सादिकनगरमध्ये असलेल्या भंगाराच्या गोदामात गोवंशाची जनावरे निदर्यीपणे बांधून ठेवण्यात आल्याची व गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची खबर इंदिरानगर पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार इंदिरानगर पोलिसांनी रविवारी (ता. ७) पहाटेच्या सुमारास सापळा रचून भंगार गोदामावर छापा टाकला. त्यावेळी गोदामात ४८ हजार रुपयांची दोन गायी व दोन गोर्हे यांना चारापाणी न देता अत्यंत निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आलेली होती. (latest marathi news)

तसेच, चार गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे ७ हजार रुपयांचे ८७० किलो गोमांस यावेळी जप्त करण्यात आले. यावेळी गोदामातून दोन धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. संशयित हाजी रशीद अली व त्याचे तीन साथीदारांविरोधात याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार डोळस हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT