Prakash Shinde esakal
नाशिक

Nashik Pomegranate : एकरी 10 टन डाळिंबाची यशस्वी शेती; लढवय्या युवा शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रयोग

Nashik Pomegranate : प्रकाश बाळू शिंदे यांची विंचूरे शिवारात एकरी दहा टन डाळिंबाचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.

अंबादास देवरे

सटाणा : पदवीधर असूनही नोकरीच्या मागे न धावता विंचूरे (ता. बागलाण) येथील प्रकाश बाळू शिंदे ऊर्फ (आबा) यांची विंचूरे शिवारात एकरी दहा टन डाळिंबाचे उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. डोंगर उतारावर वडिलोपार्जित १६ एकर खडक, मुरूम, माती मिश्रित बरड जमिनीवर विहीर खोदूनही पाण्याचा उद्भव नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब शेतीचा प्रयोग यशस्वी करून मोठे काम केले. बागलाण तालुक्याचा काही भाग अति दुष्काळी तर काही भाग चांगल्या बागायतीचा. (cultivation of 10 tons of pomegranate per acre )

मार्च,एप्रिल व मे महिन्यात टँकरने पाणी देऊन बागा जगवणारे शेतकरी या तालुक्यात आहेत. विंचूरे येथील शिंदे यांनी उंच सखल मुरबाड जमीन मोठ्या कष्टाने व भरपूर पैसा खर्च करून समतल केली. तेथे विहीर न खोदता ३ किलोमीटर अंतरावरून पाइपलाइनने पाणी आणले. त्यात ८ एकर क्षेत्रावर डाळिंब पिकाची लागवड केली. मुरबाड जमिनीत गुंतवणुकीने उभी केलेली डाळिंब बाग अवधी तीन पिके घेतल्यानंतर तेल्या नावाच्या रोगाला बळी पडली.

सलग तीन वर्षे पिकात तोटा आल्याने नाइलाजाने बाग उपटून फेकून देणे भाग पडले. पण पुन्हा कर्जरूपाने व कांदा, कोबी, कोथिंबीर व भाजीपाला या सारख्या पिकातून मिळालेल्या उत्पन्नातून त्याच जमिनीत द्राक्षबाग फुलवली. डाळिंबाप्रमाणेच द्राक्षातही सुरवातीला दोन-तीन पिके काढल्यानंतर सलग तीन ते चार वर्ष तयार झालेले द्राक्ष पीक अति पावसामुळे बाजारात गेलंच नाही. शिल्लक असलेला पैसा व कर्जरूपाने घेतलेला पैसा सलग तीन वर्षे द्राक्ष बाग जतन करण्यात व फुलवण्यात गेला. (latest marathi news)

अशाही स्थितीत, धाडसी प्रकाश शिंदे यांनी त्यांचे वडील बाळू शिंदे यांच्यासह कुटुंबाच्या मदतीने पुन्हा बरड जमिनीत पुन्हा ८ एकर वर डाळिंब लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आधुनिक तंत्रज्ञानाने ठिबक संचाचा वापर केला. द्राक्ष शेतीच्याच जागेवर डाळिंब लागवड केल्याने द्राक्ष बागेच्या तार व अँगल या स्ट्रक्चरचा वापर डाळिंबाच्या फांद्या बांधण्यासाठी केला. १०० ग्रॅमचे फळ तयार झाल्यावर बागेवर नेटलॉन आच्छादन केले. खत व औषध फवारणीचे कार्यक्षम व्यवस्थापन करून उत्कृष्टरीत्या निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतले.

एकरी दहा टन

अवघ्या २४ महिन्याच्या झाडावर एकरी दहा टन याप्रमाणे आठ एकरात ८० टनाचे उत्पादन त्यांना मिळाले. मागील सलग तीन वर्षात आलेल्या आर्थिक व नैसर्गिक आपत्तीवर मात करून प्रकाश (आबा)ने आपल्या जिद्दीने व धाडसाने सगळ्या कुटुंबीयांना सोबत घेऊन यशाकडे झेप घेतली. शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन, काटेकोर आर्थिक व्यवस्थापन, रोज काहीतरी नवीन शिकण्याची प्रबळ इच्छेतून निर्माण झालेला संघर्षमय प्रवास नोकरीचे स्वप्न पाहत त्यासाठी धावणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: शुभमन गिलला पावसाची भीती दाखवणाऱ्या हॅरी ब्रुकला आकाश दीपने दिला गुलिगत धोका; पाहा Video

Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! गुप्तांगात बाटली फसली; लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...

Scorpio Soulmate Match: वृश्चिक राशीसाठी परफेक्ट जोडीदार कोण? जाणून घ्या कोणत्या राशीसोबत टिकेल नातं

Solapur News: 'तांदळाच्या दाण्यावर साकारले विठ्ठल-रखुमाई'; सोलापूरच्या कलाकाराने साधली किमया

माेठी बातमी! 'गैरप्रकार करणाऱ्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश'; बदल्‍यांच्‍या लाभासाठी चुकीची कागदपत्रे दिल्‍याचे स्‍पष्‍ट

SCROLL FOR NEXT