Dr. Madhuri Kanitkar, Chancellor of Maharashtra University of Health Sciences Lt. Gen. (Retd.) while unveiling the poster of Jijisha International Conference. including other approvals. esakal
नाशिक

Nashik News : आरोग्य विज्ञानपीठात जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषद; कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर

Nashik : आयुष क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषद बेंगळूरु (कर्नाटक) येथे आयोजित केली जात असते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आयुष क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषद बेंगळूरु (कर्नाटक) येथे आयोजित केली जात असते. या वर्षी प्रथमच ही परिषद महाराष्ट्रात आयोजित होत आहे. ११, १२ एप्रिलला गुरुदक्षिणा सभागृहात ही परिषद होणार असून, परिषदेच्‍या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ.माधुरी कानिटकर यांच्‍या हस्‍ते करण्यात आले. (Nashik Curiosity International Conference at Arogya Vigyan Peeth marathi news)

वि‌द्यार्थी निधीच्या माध्यमातून आयोजित होत असलेल्या या परिषदेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान वि‌द्यापीठ व आयुर्वेद महाविद्यालय सहआयोजक म्हणून या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. तसेच आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य या परिषदेस सहाय्य मिळते आहे. या जिज्ञासा परिषदेत देशभरतून दीड हजार वि‌द्यार्थी, प्राध्यापक, वैद्य तसेच आयुष क्षेत्रातील विविध भागधारक सहभागी होणार आहे.

जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषद २०२४ चे पोस्टर अनावरण कुलगुरु डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, आयुष विभाग प्रमुख वैद्य गीतांजली कार्ले, सहयोगी प्राध्यापिका वैद्य श्वेता चौधरी, जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषद २०२४ चे संचालन समिती सचिव रोहन मुक्के, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. वैद्य विनय सोनंबेकर, अभाविपचे नाशिक महानगर अध्यक्ष प्रा. प्रदीप वाघ, महानगरमंत्री ओम मलुंजकर उपस्थित होते.(Latest Marathi News)

आयुष अर्थात आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी या पारंपरिक चिकित्सा पद्धतींचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे. व आयुष अंतर्गत येणाऱ्या या चिकित्सा पद्धतींचा व सिद्धांतांचा केवळ पुस्तकी अभ्यास न करता विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रत्यक्ष चिकित्सेसाठी उपयोग करून समाजाच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे, या उ‌द्देशासह जिज्ञासातर्फे ' लर्न आयुष टु प्रॅक्‍टिस आयुष ' या बोधवक्यासह वि‌द्यार्थी केंद्रित व समाज उपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.

आयुर्वेद व अन्य पारंपरिक चिकित्सा पद्धतींना जागतिक स्थरावर आरोग्य व्यवस्थेमध्ये उल्लेखनीय स्थान मिळत असताना त्यादृष्टीने आपली शिक्षण व्यवस्था हे जागतिक आव्हान पेलण्यासाठी सक्षम बनवण्याची आवश्यकता आहे. यासाठी आयुषच्या शैक्षणिक परिघातील प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय विद्यार्थी, अध्यापक आणि वैद्य या सर्वांनी एकत्र येऊन अभ्यासक्रमात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी जिज्ञासा प्रयत्नशील असते. त्‍यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार असल्‍याची माहिती यावेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT