Nashik Lok Sabha Constituency esakal
नाशिक

Dhule Lok Sabha Constituency : निकालाबाबत उत्सुकता शिगेला; आकडेमोड सुरुच

Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये चुरशीची निवडणूक झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये चुरशीची निवडणूक झाली आहे. ४ जूनच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन मतदारसंघातील आघाडी-पिछाडी संदर्भात येथे जोरदार चर्चा होत असून आकडेमोडीला वेग आला आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात अत्यंत चुरशीची झाली आहे. ()

कॉंग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना मालेगाव मध्यमधून जवळपास पाऊणेदोन लाखाचे मताधिक्क्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना मालेगाव बाह्य व बागलाणमधून किती आघाडी मिळते यावर विजयाचे गणित अवलंबून असल्याचे जाणकारांचे मत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा या तीन विधानसभा मतदारसंघांचा तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन मतदारसंघांचा समावेश आहे.

मुस्लीमबहुल असलेल्या मालेगाव मध्यमध्ये झालेले दोन लाख ५ हजार ७५९ मतदानाचीच सर्वत्र चर्चा आहे. येथे कॉंग्रेस उमेदवाराला ९० टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मालेगाव मध्यतील ही जम्बो आघाडी डॉ. भामरे कशी भरुन काढणार याची आकडेमोड त्यांचे समर्थक करतांना दिसत आहेत. गेल्या निवडणुकीत डॉ. भामरेंना मालेगाव बाह्यमधून ९४ हजार १४७ मतांची तर बागलाणमधून ७२ हजाराचे २३१ मताधिक्य मिळाले होते. (latest marathi news)

यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. मालेगाव बाह्यमधून डॉ. भामरेंना ५० हजाराच्या आसपास आघाडी मिळेल असे दस्तरखुद्द भाजपचे नेतेच सांगत आहेत. तर बागलाणमधून २५ ते ३० हजाराचे मताधिक्य मिळण्याची शक्यता समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. ही शक्यता गृहीत धरल्यास डॉ. बच्छाव यांना मालेगाव मध्यमधून मिळणारी ही आघाडी जेमतेम ८० ते ९० हजारांनी कमी होईल. याचमुळे कॉंग्रेससह महाविकास आघाडीचे समर्थक विजयाचे गणित मांडत आहेत.

निवडणुकीत वंचित आघाडी व एमआयएमचा उमेदवार नसल्याची खंत महायुतीला लागली आहे. या दोन्ही पक्षांचे उमेदवार नसल्याने डॉ. बच्छाव यांना जवळपास १ लाख मतांचा फायदा झाल्याचे मानले जात आहे. कदाचित हाच निवडणुकीतील टर्निंग पाईंट ठरण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस उमेदवाराला मालेगाव मध्यमध्ये मिळणारी संभाव्य आघाडी व इतर पाच मतदारसंघात डॉ. भामरेंना मिळणारे मताधिक्य यावरच चर्चा रंगत आहे.

धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा या तीन विधानसभा मतदारसंघातून मिळणारी आघाडी डॉ. भामरेंना तारुण नेईल असा त्यांच्या समर्थकांना विश्‍वास आहे. अत्यंत काट्याची लढत असून विजयी उमेदवाराचे मताधिक्क्य काही हजारावर असण्याची शक्यता आहे. मतमोजणी दोन दिवसावर आली असली तरी दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांना विजयाची आस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT