Onion crop spraying with the help of 'drone'
Onion crop spraying with the help of 'drone' esakal
नाशिक

Nashik Digital Agriculture : बार्डे परिसरात Drone च्या साहाय्याने औषध फवारणी!

किरण सूर्यवंशी

अभोणा (जि. नाशिक) : शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत, पुरेसा पाऊस पडत नाही, पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नाही, दिवसा वीज नाही. अशा एक ना अनेक अडचणी शेतकऱ्यांपुढे असतात. मात्र बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून,पारंपरिक पद्धत झुगारून नवीन प्रयोग कृषी क्षेत्रातही होत आहे.

असाच एक आधुनिक प्रयोग बार्डे (ता. कळवण) येथील प्रयोगशील युवा शेतकरी कैलास पवार यांनी आपल्या शेतीत केला आहे. खासगी कंपनीच्या 'ड्रोन'च्या साहाय्याने संपूर्ण कांदे पिकावर त्यांनी औषध फवारणीचा प्रयोग केला आहे. (Nashik Digital Agriculture Spraying medicine with help of Drone in Barde area Less time cost control done sitting on spot nashik news)

कांद्याच्या लागवडीनंतर, शेतात तण वाढलं तर फवारणी करण्यासाठी माणसं मिळत नाहीत. त्यातून तण माजतं आणि पीक धोक्यात येतं. यावर उपाय म्हणून श्री.पवार यांनी एकरी रुपये ४५० या दराने संपूर्ण क्षेत्रावर रासायनिक फवारणी अगदी कमी वेळात पूर्ण करून घेतली.

सध्या भारनियमनामुळे शेतात रात्रीच्या वेळी पाणी भरावे लागते. जागरणमुळे दुसऱ्या दिवशी फवारणीसाठी मजूर कंटाळा करतात. त्यामुळे जास्त मजूरी देऊनही मजूर मिळत नाही. फवारणी उशिरा झाली तर, रोगांचा प्रादुर्भाव वेगाने व मोठ्याप्रमाणात होऊन,पिकांचे नुकसान होते.

कांदा लागवडीप्रमाणे फवारणीच्या कामाचा ठेका घेणारे तरुणही गावागावात मिळतात. मात्र प्रत्येक पंपासाठी त्याला पन्नास रुपये मोजावे लागतात. एकरभर फवारणी करण्यासाठी २० पंप मारावे लागतात.

त्यासाठी एक हजार रुपयांची मजुरी जाते.पाठीवरील पंपामुळे पाठदुखी, खांदेदुखी सारखे त्रास शेतकऱ्यांना सोसावे लागतात. शिवाय रासायनिक द्रव्य नाकातोंडात व डोळ्यात गेल्याने शारीरिक इजाही होते.तसेच फवारणीत पीक पायाखाली किंवा नळीखाली तुडविले जाते. पिकाचे नुकसान होते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

ड्रोनने फवारणीस प्राधान्य

'ड्रोन'च्या फवारणीत पिकात फिरण्याची आवश्यक नाही. बसल्या जागेवरून मॉनिटरच्या साहाय्याने संपूर्ण क्षेत्रावर फवारणी होते. कमी उंचीवरून फवारणी असल्याने प्रत्येक रोपावर व जमिनीपर्यंत गरजेप्रमाणे औषध देता येते. ड्रोनला ११ लिटर पाण्याची क्षमता आहे. एक एकरासाठी एवढे औषध पुरेसे असते. पंप व ट्रॅक्टर नळीच्या गळतीने जास्त औषध
वाया जाते.

ड्रोनला दोनतीन बॅटरीचा बॅकअप असल्याने, फवारणी सुरू असताना इतर बॅटरी चार्जिंग करून ठेवता येते. त्यामुळे कमी वेळेत अखंड फवारणी होते. सोयाबीन,मका,हरभरा,कांदा,गहू यासह विविध पिकावर यशस्वीपणे कीटनाशक, तणनाशक, बुरशीनाशक, पोषकाची फवारणी 'ड्रोन' च्या साहाय्याने केली जाते. परिसरातील बहुतांश शेतकरी ड्रोन फवारणीला प्राधान्य देताना दिसत आहे.

"'फवारणीसाठी जास्त मजूरी देऊनही मजूर मिळत नाहीत.शिवाय खर्चही कमी लागतो. अतिशय वेगाने व झटपट काम होत असल्याने, इतर कामासाठी पुरेसा वेळ देता येतो.कमी उंचावरून फवारणी होत असल्यामुळे प्रत्येक रोपापर्यंत योग्यप्रमाणात औषध देता येते."

-कैलास पवार, प्रयोगशील शेतकरी,बार्डे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: MPही सूरतची पुनरावृत्ती? शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश..काँग्रेसची कोंडी

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT