Sudhakar Badgujar, district head of Ubatha group, speaking at a meeting called at Shiv Sena Bhawan to provide information regarding the filing of applications of Mahavikas Aghadi candidates in Nashik and Dindori Lok Sabha constituencies. esakal
नाशिक

Nashik-Dindori Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीचे उमेदवार 29 ला अर्ज दाखल करणार

Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीने एक पाऊल पुढे टाकत येत्या सोमवारी (ता. २९) दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik-Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघात जागावाटपावरून महायुतीच्या उमेदवारांचा घोळ अजूनही सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने एक पाऊल पुढे टाकत येत्या सोमवारी (ता. २९) दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने महाविकास आघाडीकडून शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. ( Candidates of Mahavikas Aghadi will file application form on 29 )

नाशिकमधून शिवसेनेचे (ठाकरे गट) राजाभाऊ वाजे, तर दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) भास्कर भगरे उमेदवारी अर्ज दाखल करतील. अर्ज दाखल करताना शालिमार येथील शिवसेना कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान महारॅली निघणार आहे. शिवसेना कार्यालयात महारॅलीसंदर्भात बैठक झाली.

जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, डी. जी. सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख प्रमुख जगन आगळे, देवानंद बिरारी, महेश बडवे, युवा सेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, संजय चव्हाण, मुशीर सय्यद, महानगर संघटक राहुल दराडे, विधानसभा संघटक मसूद जिलानी, मंदा दातीर आदी उपस्थित होते.  (Nashik Political News)

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यानिमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. शालिमार येथील शिवसेना कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान महारॅली काढली जाणार आहे. महारॅलीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

संघटनात्मक बळकटीसाठी काही दिवसांपूर्वी नियुक्ती करण्यात आली. लोकसभा समन्वयक निवृत्ती जाधव, उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, निवृत्ती लांबे, रमेश धांडे, तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, समाधान बोडके, नितीन लाखन, विधानसभाप्रमुख संपत चव्हाण, कचरू डुकरे, विधानसभा समन्वयक देवीदास जाधव, विधानसभा उपप्रमुख सोमनाथ जोशी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. महानगर संघटक सचिन बांडे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT