Dindori Lok Sabha Constituency  esakal
नाशिक

Dindori Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीत फूट, दिंडोरीत माकप रिंगणात; जे. पी. गावित यांची उमेदवारीची आज घोषणा

Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत फूट पडली असून माकप रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत फूट पडली असून माकप रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. माकपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास वरिष्ठ पातळीवरून आदेश मिळाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत माजी आमदार जे. पी. गावित यांची पक्षाकडून गुरूवारी (ता.२५) उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. (from CPM J. P Gavit candidate announced today )

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी माजी आमदार जे. पी. गावित यांनी केली होती. मात्र ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली. शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

यानंतर गावित यांनी एल्गार पुकारला. दिंडोरीत गावित यांनी समर्थकांसह पक्षाची बैठक घेत ही जागा माकपला सोडण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना बदला. नाही तर तुमचा उमेदवार पडणारच, असा इशारा त्यांनी शरद पवारांना दिला होता. महाविकास आघाडीने जागा न दिल्यास माकपच्या चिन्हावर लढण्याचा ठराव यावेळी झाला होता. हा ठराव पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठविण्यात आला होता.  (Nashik Political News)

यात शरद पवार गटाने दिंडोरीचा उमेदवार न बदलल्यास माकप स्वतंत्र लढणार असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यावेळी तातडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गावित यांची भेट घेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. लोकसभा नव्हे; विधानसभा निवडणुकीत आघाडीत माकपला जागा सोडल्या जातील असा प्रस्ताव पाटील यांनी यावेळी दिला.

तसेच याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे देखील आश्वासन दिले. मात्र, गावित यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिलेला प्रस्ताव फेटाळून लावत, उमेदवारीचा आग्रह कायम ठेवला. महाविकास आघाडीकडून प्रतिसादाची प्रतिक्षा असताना माकपच्या वरिष्ठ पातळीवरून चिन्हावर निवडणुक लढण्याचे आदेश मिळाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यामुळे माकप आता स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार हे निश्चित झाले आहे.

''माकपच्या वरिष्ठ पातळीवरून चिन्हावर निवडणुक लढविण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. पक्षाकडून उमेदवारीची गुरूवारी घोषणा होणार आहे. त्यानुसार दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी माकपच्यावतीने अर्ज दाखल करणार आहे.''- जे. पी. गावित (माजी आमदार, माकप)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT