SAKAL Impact  esakal
नाशिक

SAKAL Impact : शवागारातील मृतदेहांची वेळेत विल्हेवाट लावा! पालकमंत्र्यांनी पोलीस, महापालिकेला दिले आदेश

Nashik News : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवागारातील शीतपेट्यांमध्ये बेवारस मृतदेह महिना-महिना पडून असल्याच्या समस्येची पालकमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवागारातील शीतपेट्यांमध्ये बेवारस मृतदेह महिना-महिना पडून असल्याच्या समस्येची पालकमंत्री दादा भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व जिल्हा शल्यचिकित्सकांसमवेत बैठक याप्रकरणी बेवारस मृतदेहांची तातडीने तपास करून त्यांची वेळेत विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. (Dispose of dead bodies in morgue in time)

दै. सकाळ’मध्ये सोमवारी (ता. ८) ‘सिव्हिल’च्या शवागारावरून तू-तू,, मै-मै’ या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्‌ध झाले होते. यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिकेचे आयुक्त अशोक करंजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शवागारातील मृतदेहांसंदर्भातील माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंदे यांनी दिली.

शीतपेट्यामध्ये आजमितीस बेवारस १३ मृतदेह असून, तीन दिवसांमध्ये त्यांची विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना ते महिनाभरापासून पडून आहेत. त्यामुळे मृतदेह कुजून त्यातून दूर्गंधी सुटते आणि शीतपेट्याही खराब होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. मानवी हक्क आयोगाच्या नियमांनुसार, मृतदेहांची ओळख पटविल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात.

परंतु बेवारस मृतदेहाची ओळख पटत नाही. त्यामुळे पोलिसांकडून वेळेत अहवाल प्राप्त होत नाही. परिणामी महापालिकेच्या आरोग्य विभागालाही त्या मृतदेहांची विल्हेवाट लावताना अडचणी येत असल्याचे मनपा आयुक्त करंजकर यांनी यावेळी सांगितले. (latest marathi news)

चर्चेअंती पालकमंत्र्यांनी बेवारस मृतदेह शवागारातील शीतपेट्यांमध्ये अधिक दिवस न राहता त्यांचा तपास करून त्यांची महापालिकेमार्फत लवकरात लवकर विल्हेवाट लावावी, असे आदेश मनपा आयुक्तांना दिले आहेत.

"पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसमवेत बैठक होऊन त्यात शवागारातील बेवारस मृतदेहांसंदर्भातील मुद्यावर चर्चा झाली. यात पालकमंत्र्यांनी बेवारस मृतदेह शीतपेट्यांमध्ये अधिक दिवस राहणार नाही यासाठी तातडीने प्रक्रिया पार पाडून महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यावर अंत्यसंस्कार करण्यासंदर्भातील सूचना केल्या आहेत. त्यामुळे लवकरच त्यानुसार कारवाई होईल. तसे पत्र जिल्हा रुग्णालयाकडून नाशिक महापालिका आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आलेले आहे." - डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT