Chief Executive Officer Ashima Mittal, Deputy Director of Health Dr. Kapil Aher, Dr. Sudhakar More, Virendra Bansal, Sesharam Verma along with officers and staff present. esakal
नाशिक

Nashik News : सीएसआर फंडातून जि. प. आरोग्याला 3 रुग्णवाहिका

Nashik : नाशिक जिल्ह्यासाठी तीन अद्ययावत रुग्णवाहिका व संभाजीनगर जिल्ह्यासाठी एक रुग्णवाहिका अशा एकूण चार रुग्णवाहिकेचे लोकार्पण शुक्रवारी (ता.२६) जिल्हा परिषदेत झाले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : स्टेट बँक ऑफ इंडिया कॅपिटल मार्केट लिमिटेड आणि कन्सर्न इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यासाठी तीन अद्ययावत रुग्णवाहिका व संभाजीनगर जिल्ह्यासाठी एक रुग्णवाहिका अशा एकूण चार रुग्णवाहिकेचे लोकार्पण शुक्रवारी (ता.२६) जिल्हा परिषदेत झाले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे, वीरेंद्र बन्सल, शेषराम वर्मा (SBICAPS) जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ हर्षल नेहते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दीपक लोणे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, कृष्णन कुट्टी, रोशन नेगी, गोविंद राव, अ‍ॅना जॉय , कन्सर्न इंडिया फाउंडेशन बियान्का नागपाल आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्ह्यासाठी आणखी ३० रुग्णवाहिकांची गरज असून याबाबत संस्थेने सहकार्य करावे असे आवाहन डॉ. मोरे यांनी प्रास्ताविकात केले. जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागासाठी रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने या भागातील नागरिकांना सुविधा देणे शक्य होणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र काळुस्ते, ठाणापाडा, पांगारणे, यांना या रुग्णवाहिका देण्यात आल्या. सॅन्ड्रा तिरकी यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी अना जॉय, बियांका नागपाल, पंकज आमटे, सुरेश जाधव, प्रदीप निकम, संजय गांगुर्डे, सुरेखा गुंबाडे यांनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नीलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल; दुसऱ्याच्या आधारकार्डावर घेतले सिमकार्ड, बँक खात्यांतून फसवणूक

NHAI on Dirty Toilets : 'हायवे'वरील घाणेरड्या शौचालयाची माहिती द्या, अन् बक्षीस म्हणून मिळवा FASTag साठी एक हजाराचं रिचार्ज!

HSC SSC Exam : बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून; तर दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार सुरू

PF withdrawal latest Update : दिवाळीआधी केंद्र सरकारकडून नोकरदारवर्गास ‘GOOD NEWS’ ; 'PF'ची १०० टक्के रक्कम काढता येणार!

Sangli News : ‘पावती करायची नाय...’ ही एक ‘रील’ पडली महागात

SCROLL FOR NEXT