suraj mandhare
suraj mandhare 
नाशिक

Bird Flue :85 लाख पक्ष्यांच्या बचावासाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणा सज्ज; 28 पथक कार्यरत

विनोद बेदरकर

नाशिक : देशात कोरोनापाठोपाठ बर्ड फ्लूने थैमान घातले आहे. कावळ्यासह काही जंगली पक्ष्यात बर्ड फ्लू दिसून आला असला तरी जिल्ह्यातील 1540 पोल्ट्रीत एकाही पक्षात बर्ड फ्लू आढळलेला नाही. मात्र असे असले तरी, जिल्ह्यातील बर्ड प्लू च्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी 28 पथक तयार केली आहेत. अशी माहीती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. 

पक्षाचे नमुने तपासून येण्यास उशीर लागणार..

राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधीक 1540 इतक्या कुकुटपालन उद्योग (पोल्ट्री) आहेत. त्यात, साधारण 85 लाखांच्या आसपास पक्षी आहेत. सगळीकडे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्याच्या चर्चा जोरात आहे. नाशिकला काही भागात कावळे, चिमण्यासह जंगली पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षण आढळली आहेत. पण अद्याप कोंबड्यांमध्ये मात्र फ्लूची लक्षणे आढळलेली नाहीत. बर्ड फ्लू संदर्भातील तपासण्यासाठी नमुने पुण्याला पाठविली आहेत. पुण्याहून हे नमुने भोपाळयेथे पाठविले जातात. नमुने येण्यासाठी उशीरा लागणार आहे. मात्र आतापर्यत तरी कुठलाही बर्ड प्लूचा प्रादुर्भाव नाही. काही लक्षण आढळल्यास तो रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.

अफवा पसरु देऊ नका..

प्रशासनाने गुरुवारी रात्री कुुकुटपालन उद्योजकांची बैठक घेतली. त्यात, अडचणी ऐकल्या. सोशल मिडियावरील चुकीच्या अफवामुळे जिल्ह्यातील पोल्ट्री उद्योगाविषयी सामान्यांत चुकीचा संदेश जाउन मोठा आर्थिक फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी जिल्हा यंत्रणेसह पोलिसांनी लक्ष ठेवावे अशी मागणी उद्योजकांनी जिल्हाधिकाऱयांकडे केली. तसेच इतर अडचणीबाबत चर्चा होउन त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने 28 पथक कार्यरत केली आहेत. 

अहवाल बाकी

इगतपुरी, सुरगाणा भागातील नमुन्याबाबत अद्याप अहवाल आलेले नाही. त्यामुळे यंत्रणेने 85 लाखांवर पक्ष्याच्या संरक्षणासह काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सुचना देत यंत्रणा कार्यान्वीत केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT