Nashik District Bank  esakal
नाशिक

Nashik District Bank : सल्लागार मंडळाकडून जिल्हा बॅंकेचा आढावा

Nashik District Bank : सहकार विभागाने सल्लागार मंडळाची नियुक्ती केल्यानंतर मंडळातील सदस्यांकडून तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हा बॅंकेचा आढावा घेतला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik District Bank : आर्थिक अडचणीत सापडलेल्या आणि परवाना धोक्यात सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रशासक यांना साहाय्य करण्याकरिता सहकार विभागाने सल्लागार मंडळाची नियुक्ती केल्यानंतर मंडळातील सदस्यांकडून तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हा बॅंकेचा आढावा घेतला जात आहे. ()

दोन दिवसांपासून हा आढावा सुरू आहे. नाशिक जिल्हा बॅंक सद्यःस्थितीत आर्थिक अडचणीत सापडली आहे. मार्च २०२३ अखेर बँकेकडील भांडवल पर्याप्तता उणे ६८.४३ टक्के, नक्त मूल्य उणे ६७२ कोटी, संचित तोटा १३३७ कोटी (७१ टक्के) तसेच बँकेस ९०९ कोटीचा संचित तोटा आहे.

बॅंकेची वसुली ठप्प झाल्याने एनपीए वाढला आहे. त्यामुळे बॅंकेचा परवाना अडचणीत आला आहे. त्यामुळे बॅंकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे आदींनी पुढाकार घेत सहकारमंत्री यांच्या समवेत बैठक घेतल्या. यात बॅंकेला अॅक्शन प्लॅन बनवित कार्यवाही सुरू केली आहे.

असे असतानाही बँकेची वसुलीत सुधारणा धीम्यागतीने होत आहे. बॅंकेवर सद्यःस्थितीत प्रशासकाची नियुक्ती आहे. बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सांघिक प्रयत्नाची आवश्यकता असून बँकेवरील प्रशासकास काही बाबींवर निर्णय घेण्यासाठी मदतीची तथा सल्ल्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी प्रशासक प्र. बा. चव्हाण यांना साहाय्य करण्याकरिता सहकार विभागाने तीन सदस्य मंडळाची नियुक्ती केली. तीन सदस्यीय मंडळामध्ये जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी, नाबार्डचे सेवानिवृत्त मुख्य महाप्रबंधक एम.एल. सुखदेवे आणि राज्य सहकारी बँकेचे प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापक यांचा समावेश होता.

या सदस्य मंडळाने ३१ मार्चच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बॅंकेत दाखल झाले असून आढावा घेत आहे. यात प्रामुख्याने बॅंकेच्या एकूण ठेवी किती आहेत, बँकेने केलेले कर्जवाटप, सुरू असलेली वसुली, थकबाकीदारांकडून वसुली असलेल्या उपाययोजना याचा माहिती घेतली जात आहे. प्रत्येक विभागाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

वसुली येणाऱ्या अडचणी यावेळी एम.एल. सुखदेवे यांनी समजून घेतल्या. वसुली होण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजे, याबाबतही त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या आढाव्यानंतर सल्लागार समिती सदस्यांची बैठक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT