The entrance and stairs of the Indrai Fort here are buried under the mounds of mud. In second photo, the entrance and stairs cleared after cleaning by the Durgsevak of Sahyadri Pratishthan. esakal
नाशिक

Indrai Fort: ‘इंद्राई’च्या प्रवेशद्वार-पायऱ्यांनी घेतला मुक्तश्वास! नाशिकच्या सहयाद्री प्रतिष्ठानच्या दुर्गप्रेमींनीचा पुढाकार

Nashik News : शेवटच्या घटका मोजत असलेल्या गडकिल्ल्यांना पुन्हा एकदा उर्जितावस्था प्राप्त होत असल्याने पर्यटकांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांचे आभार मानले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

गणूर : परकीय आक्रमण, हल्ले, उन, वारा, पावसात गेल्या अनेक वर्षापासून गडकिल्ले आज शेवटच्या घटका मोजत आहेत. या गडकिल्ल्यांना पुन्हा एकदा नव्याने त्यांचे अस्तित्व मिळवून देण्यासाठी नाशिक येथील सहयाद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी पुढाकार घेतला आहे. शेवटच्या घटका मोजत असलेल्या गडकिल्ल्यांना पुन्हा एकदा उर्जितावस्था प्राप्त होत असल्याने पर्यटकांनी सह्याद्री प्रतिष्ठानच्या मावळ्यांचे आभार मानले आहेत. (nashik ganur indrai fort marathi news)

शेकडो वर्ष उलटूनही असंख्य गडकोट आजही ऊनवारा, वादळ- पाऊस झेलत आपले अस्तित्व मातीच्या ढिगाऱ्याखाली गमावून बसले आहेत. सहयाद्री प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पराक्रमी स्वराज्य रक्षक गडकिल्यानां त्यांचे अस्तित्व मिळवून देण्याचे काम करत आहेत.

त्यांचे संवर्धन अहोरात्र करत आहे. असाच एक दुर्ग किल्ला इंद्राई, साक्षात इंद्राचा वास असावा असा प्रशस्त, बेलाग - कणखर आहे. मात्र प्रवेशद्वार व पायरी मार्ग अनेक वर्षांपासून मातीच्या व तटबंदीच्या दगडाखाली गाडला गेला होता. इंद्राई किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्या ढिगाऱ्याखालून मोकळ्या करण्यासाठी सहयाद्री प्रतिष्ठान दुर्गसेवकांनी रविवारी (ता. २५) सकाळी संवर्धन मोहिमा हाती घेतली. (Latest Marathi News)

सात आठ तास काम केल्यावर किल्ले इंद्राईला त्याचे प्रवेशद्वार परत मिळवून देण्यात सह्याद्रीचे दुर्गसेवक यशस्वी ठरले. मातीत गाडले गेलेले प्रवेशद्वार तसेच पुन्हा नव्याने आपला पराक्रमी इतिहास अभिमानाने सांगण्यासाठी सज्ज झाला आहे.

दुर्गसेवकांच्या अथक मेहनतीतून प्रवेशद्वाराने घेतलेला मोकळा श्वास पाहून दुर्गसेवक सुखावले आहेत. सर्व दुर्गसेवकांच्या कष्टाचे चीज झाले. प्रवेशद्वाराला पुष्पहार घालून, भंडाऱ्याची उधळण करून जल्लोषात किल्ले इंद्राईला दिलेले संवर्धनाचे वचन पूर्ण करून पुढील संवर्धन कार्याची शपथ घेऊन मोहिमेची सांगता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT