Vaibhav Deore Arrested esakal
नाशिक

Nashik Vaibhav Deore Case: खंडणीखोर वैभव देवरेची पोलिसांनी काढली धिंड! लखमापूरच्या फार्महाऊस, घराच्या झडतीत महत्त्वाचे दस्त जप्त

Crime News : अव्वाच्या सव्वा दराने रक्कम वसुल करून खंडणी मागणाऱ्या वैभव देवरेची इंदिरानगर परिसरातून मंगळवारी (ता. १६) धिंड काढण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Vaibhav Deore Case : अव्वाच्या सव्वा दराने रक्कम वसुल करून खंडणी मागणाऱ्या वैभव देवरेची इंदिरानगर परिसरातून मंगळवारी (ता. १६) धिंड काढण्यात आली. दरम्यान, देवरेच्या लखमापूर येथील ५ एकरातील अलिशान फार्महाऊस आणि नाशिकमधील घरात पोलिसांनी दोन दिवसांपासून झडतीसत्र राबविले आहे. यातून पोलिसांच्या हाती महत्त्वाचे दस्तऐवज लागले आहेत. (Nashik Extortionist Vaibhav Deore arrested by police news)

१२ लाखांच्या खंडणीप्रकरणी सध्या वैभव देवरे यास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत देवरे याच्याविरोधात चार गुन्हे दाखल झालेले आहेत. इंदिरानगर पोलिसांनी देवरे याची मंगळवारी (ता. १६) इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर या परिसरातून धिंड काढण्यात आली.

इंदिरानगर पोलिसांनी देवरे याच्या लखमापूर (ता. सटाणा) येथील पाच एकरात अलिशान बनविलेल्या फार्म हाऊस आणि नाशिकमधील दोन फ्लॅटची घरझडती घेतली. यात पोलिसांच्या हाती देवरे याने दिलेल्या कर्जाच्या पैशांच्या नोंदी, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे सापडली आहे. त्याचप्रमाणे काही चारचाकी वाहनांचे आरसीबुकही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

संशयित देवरे याने अनेकांना व्याजाने पैसे दिल्यानंतर त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे वसुल करताना त्यांच्या मालमत्तेवरही कब्जा केला आहे. यात काही घरांची कागदपत्रेही हाती लागल्याने पोलिसांनी त्या दिशेनेही आता तपास सुरू केला आहे. (latest marathi news)

पहिला गुन्हा वर्ग

विजय खानकरी यांच्या फिर्यादीनुसार, देवरे याच्याविरोधात इंदिरानगर पोलिसात १२ लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास इंदिरानगर पोलिसांकडून शहर गुन्हेशाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मोठ्या रकमांचे ट्रँजेक्शन्स

संशयित देवरे हा त्याच्या बँक खात्यातून मोठी रक्कम कर्जदाराच्या बँक खात्यावर वर्ग करायचा. परंतु त्यातील अर्धीअधिक रक्कम तो रोख स्वरुपात काढून घ्यायचा. अशा प्रकारचे मोठ्या रकमांचे अनेक ट्रॅंजेक्शनच त्याच्या बँक खात्यातून दिसून आले आहेत.

पोलिसांचे आवाहन

संशयित देवरे याने बेकायदेशीर सावकारी करीत अनेकांची आर्थिक पिळवणूक केली आहे. त्याचप्रमाणे, अनेक महिलांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार केल्याचीही चर्चा शहरात आहे. त्यामुळे देवरे याच्याविरोधात तक्रारीसाठी पोलिसांकडे यावे, तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन शहर गुन्हेशाखेतर्फे करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT