Members of Sri Ganesha Men's Savings Group demonstrating sericulture.
Members of Sri Ganesha Men's Savings Group demonstrating sericulture. esakal
नाशिक

Nashik Silk Industry : साप्ते गावात बहरतेय रेशीम उद्योगाची शेती; शेतकऱ्यांची स्थलांतरापासून सुटका

सकाळ वृत्तसेवा

Nashik Silk Industry : हवामानाच्या भरवशावर पारंपारिक शेती करता येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांना दोन वेळच्या अन्नासाठी इतरत्र स्थलांतर करावे लागते. साप्ते गावात अशीच परिस्थिती होती. अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट आणि महिंद्रा ॲन्ड महिंद्रा यांच्या सहकार्याने साप्ते गावातील कश्यपी धरणातून दोन बंधाऱ्याचे गाळ उपसून त्याची दुरुस्ती करण्यात आली. बंधाऱ्याचे काम झाल्यानंतर पाणी साठवण्याची क्षमता वाढली. (Nashik Farming of silk industry is flourishing in Sapte village marathi news)

त्यातून गावातील दहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन श्रीगणेशा पुरुष बचतगटाची स्थापन केला. शेतीला जोडधंदा करत रेशीम उद्योगाला सुरवात केली. पहिल्याच प्रयत्नात यश आल्यावर स्थलांतराचा प्रश्नच मिटला. साप्तेतील शेतकऱ्यांनी एक एकर शेतात सात हजार तुतीच्या झाडांची लागवड केली. आदिवासी भागात पाऊस अधिक असल्याने बरीच झाडे दगावली. जिल्हा रेशीम उद्योग केंद्रात जाऊन सर्व माहिती समजून घेतली.

सुरवातीला पहिली रेशीम कोश बनवण्याची बॅच तयार केली. केंद्रात नाव नोंदणी केल्यानंतर बचतगटाचे प्रमुख शांताराम चौधरी यांच्या नावावर एक अंडे पुंच्छची बँग खरेदी केली. सुरवातीला अंड्यातून अळी निघण्याची प्रक्रिया होते. त्यानंतर अळींना तुतीची कोवळी पाने तोडून खाण्यास दिली जातात. अळी मोठी झाल्यानंतर ५-६ दिवसांनी दिवसातून १०-१२ किलो पाने सहज खाऊन टाकते आणि २८ दिवसानंतर अळईवर चंद्रिका (जाळ्या) टाकल्या जातात.

त्यातून पांढरा शुभ्र कोष तयार होतो. या रेशमाचा एक धागा साधारण ५०० मीटरपर्यंतचा असतो. पुढील ७ दिवसात या शेतकऱ्यांनी २५ किलो रेशीम कोशाची पहिली यशस्वी बॅच तयार केली. त्यानंतर बीड येथील रेशीम बाजारात कोष विकण्यास घेऊन गेले असता, ३८० रुपये प्रतिकिलो इतका भाव मिळाला त्यातून १० हजार रुपये नफा शेतकऱ्यांना मिळाला. (latest marathi news)

दरम्यान, आता या शेतकऱ्यांकडे विपुल प्रमाणात तुतीची झाडे आहेत. जी साधारण २० वर्ष टिकतात, तसेच शेड चंद्रिकाचे साहित्य उपलब्ध असल्याने आता केवळ अंडे पुंच्छ घेणे आणि त्याची व्यवस्थित निगा राखून उत्पन्न घेणे हेच या शेतकऱ्यांचे ध्येय आहे. पहिलीच बॅच असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने १ हजार रुपये नफा वाटून न घेता बचत गट मोठा कसा होईल यावर भर दिला असून मुलांच्या शिक्षणाचा, रोजगाराचा परिणामी स्थलांतराचा प्रश्न उरणार नाही.

शाश्वत उत्पन्न मिळाल्याने साप्ते गावात ८ शेतकरी आता रेशीम उत्पादक शेतकरी होवू पाहत आहे. उद्योग यशस्वितेसाठी अभिव्यक्तीचे भिला ठाकरे, सुचेता कुलकर्णी, भिकन दंडगव्हाळ, रणजित गाडगीळ यांचे सहकार्य लाभले.

अशी असते प्रक्रिया

-सुरवातीला अंड्यातून अळी निघण्याची प्रक्रिया

-अळींना तुतीची कोवळी पाने तोडून खाण्यास देणे

-५-६ दिवसांनी अळ्या मोठ्या झाल्यावर दिवसातून १०-१२ किलो पाने खातात

-२८ दिवसानंतर अळीवर चंद्रिका (जाळी) टाकली जाते

-पुढील ७ दिवसात शुभ्र रेशीम कोशाची निर्मिती

''भात, नागली, वरई उत्पादन शेतातून घेत होतो पण, अवकाळी पावसाचा फटका बसल्यावर संपूर्ण शेतीचे नुकसान व्हायचे आणि हाती काहीच यायचे नाही. परिणामी इतरत्र रोजंदारीवर जावे लागायचे. गावातील सर्व शेतकऱ्यांची अशीच अवस्था होती त्यावर तोडगा काढत एकत्र येत बचत गट स्थापन केला आणि रेशीम उद्योगाची माहिती घेऊन ग्रुप शेती करायला सुरवात केली. पहिल्यात प्रयत्नात यश आल्यावर भविष्यात रेशीम उद्योगाच्या शेतीत करण्याचे आम्ही ठरविले आहे.''- शांताराम चौधरी, प्रमुख, श्रीगणेशा पुरुष बचतगट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT