Sheikh Nisar Sheikh Abrar  esakal
नाशिक

Nashik Accident News : पिता-पुत्राचा अपघातात मृत्यू

Accident News : संवदगाव फाट्यावर पहाटे पायी फिरायला जाणाऱ्या पिता-पुत्राला पिक-अपने जबर धडक दिल्याने अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Accident News : येथील संवदगाव फाट्यावर पहाटे पायी फिरायला जाणाऱ्या पिता-पुत्राला पिक-अपने जबर धडक दिल्याने अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. बुधवारी (ता. १७) सकाळी पावणेसातच्या सुमारास ऐन मोहरमच्या दिवशी हा अपघात घडल्याने बजरंगवाडी भागात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पिक-अप चालकाविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. (Father and son died in an accident in malegaon )

येथील बजरंगवाडी भागातील माजी नगरसेवक व महापालिकेतील शिक्षण मंडळाचे माजी सभापती शेख निसार शेख अकबर ऊर्फ राशनवाले (वय ५५) व त्यांचा मुलगा शेख अबरार शेख निसार (२०) युनिकॉर्न दुचाकीने संवदगाव फाट्याकडे फिरायला गेले होते. त्या वेळी भरधाव येणाऱ्या पिक-अपने (एमएच ४८ सीबी ८६६३) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. अपघातात निसार यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मुलगा अबरारने जखमी अवस्थेतच वडिलांचा मोबाईल काढून कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच अबरारचाही वडिलांचा मृत्यू बघून धास्तीने मृत्यृ झाला. अबरार अनेक दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होता. डायलिसिससाठी मुंबई, पुणे व मालेगाव येथील रुग्णालयांत त्याच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार रोज पहाटे नमाजनंतर दोघे पिता-पुत्र फिरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असत.

मात्र बुधवारी काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघातात दोघांचाही मृत्यृ झाला. घटनास्थळी माजी नगरसेवक खालीद हाजी, शेख मुश्‍ताक शेख शरीफ, समशेर खान, सिकंदर शेख यांच्यासह नातेवाईक पोचून त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. दोघांवर येथील बडा कब्रस्तानात दफनविधी पार पडला. या वेळी शहरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT