Money Fraud esakal
नाशिक

Nashik Fraud Crime News : MBBS प्रवेशाचे आमिष दाखवून 34 लाखांना गंडा; दोघांविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल

Crime News : सचिन वामन म्हात्रे (रा. रिजेन्सी सोसायटी, दावडीगाव, डोंबिवली, ठाणे), कल्पना रघुनाथ पाटील (रा. प्रतिक रेसीडेन्सी, नाशिकरोड) असे दोघा संशयितांची नावे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud Crime News : कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएस शिक्षणक्रमासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून ३४ लाख ६१ हजार रुपये उकळणार्याद दोघांविरोधात मुंबई नाका पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन वामन म्हात्रे (रा. रिजेन्सी सोसायटी, दावडीगाव, डोंबिवली, ठाणे), कल्पना रघुनाथ पाटील (रा. प्रतिक रेसीडेन्सी, नाशिकरोड) असे दोघा संशयितांची नावे आहेत. (Nashik Fraud Crime 34 Lakhs defrauded from two by luring MBBS admission)

विशाखा दिनकर वानखेडे (रा. सोनाली अपार्टमेंट, कॉलेजरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलाला एमबीबीएस करायचे होते. त्यासाठी त्यांना संशयितांनी कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

संशयितांनी श्रीमती वानखेडे यांचा विश्वासही संपादन केला. या प्रवेशासाठी संशयितांनी २९ सप्टेंबर २०२२ रोजी पुणा रोडवरील हॉटेल कामत येथे ३४ लाख ६१ हजार रुपये घेतले. यानंतर प्रवेश होणे अपेक्षित असताना संशयितांकडून श्रीमती वानखेडे यांच्या मुलाचे एमबीबीएसला प्रवेश झाला नाही.   (latest marathi news)

उलट त्यांची फसवणूक झाली. याप्रकरणी त्यांनी विचारणा केली असता, संशयितांनी त्यांनाच दमदाटी केली. याप्रकरणी अखेर त्यांनी मुंबई नाका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक निसार शेख हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : भारतीय मिचेल स्टार्क! ३० लाखांवरून पोहोचला थेट ८.४० कोटी; कोण आहे Auqib Nabi? पाहा गोलंदाजीचा Video

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात बंद; रुपयाच्या कमजोरीने बाजारात दबाव; वेदांताचे शेअर्स मात्र तेजीत!

IPL 2026 Auction: काव्या मारनला हवा होता फिरकीपटू, पण राजस्थान रॉयल्सने ७.२० कोटी मोजून मारली बाजी; ठरला महागडा भारतीय

ठाकरे बंधुंच्या युतीचा मुहूर्त ठरला? 'या' तारखेला अधिकृत घोषणा होण्याची शक्यता, राज ठाकरे-संजय राऊतांच्या बैठकीत काय झाली चर्चा?

मुलाला वाचवायला रक्ताचे नमुने बदलले, बाप दीड वर्षांपासून तुरुंगात; पोर्शे अपघात प्रकरणी हायकोर्टानं जामीन फेटाळला

SCROLL FOR NEXT