Ginger prices fell esakal
नाशिक

Nashik News : कच्च्यामुळे पक्क्या अद्रकचे भाव घसरले! किलोचा दर 160 ते 200 वरून थेट 40 रुपयांवर

Nashik News : बाजारात रोज चार टन नवीन व जुन्या अद्रकची विक्री होते. एप्रिल-मे महिन्यात लग्नसराई असल्याने अद्रकला मोठी मागणी होती.

जलील शेख

Nashik News : गेल्या वर्षभरापासून अद्रकला किरकोळ बाजारात १६० ते २०० रुपये किलोचा दर मिळत होता. मात्र सध्या दीड महिन्यापासून नवीन व कच्ची अद्रक आल्याने भाव घसरून ४० रुपये किलोने अद्रक विकली जात आहे. त्यामुळे जुन्या अद्रकला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून नवीन अद्रक स्वस्त असल्याने त्याची मागणी जास्त आहे. (Nashik Ginger prices fell)

येथील बाजारात रोज चार टन नवीन व जुन्या अद्रकची विक्री होते. एप्रिल-मे महिन्यात लग्नसराई असल्याने अद्रकला मोठी मागणी होती. मे मध्ये अद्रक १६० ते २०० रुपये किलोने विकले जात होते. दोन वर्षांपूर्वी अद्रकला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी अद्रक काढून कमी भावात विकली होती. गेल्या वर्षापासून अद्रकला सुगीचे दिवस आले होते. अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना

बांधावरच ११० ते १२० रुपये किलोने भाव मिळाला होता. सध्या कच्च्या अद्रकमुळे बाजारातील पक्क्या अद्रकचे भाव घसरले आहेत. नवीन अद्रकची आवक वाढली आहे. त्यामुळे येथे अद्रकच्या दराच्या दरात चौपटीने घट झाली आहे. सध्या जुन्या अद्रकचे दर घाऊक बाजारात ९० रुपये किलो आहे. तर नवीन अद्रक २० ते २५ रुपये किलोने विकली जात आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स असल्याने येथे अद्रकचा वापर होतो. तसेच मजूर वर्ग असल्याने कमी किमतीत घेण्यासाठी अनेकांचा कल असतो. येथे जून महिन्यापासून नवीन अद्रक येत आहे. शहरातील भाजीपाला बाजारात वैजापूर, कन्नड, गंगापूर. (latest marathi news)

सिल्लोड, पिशोर यासह अनेक विविध भागातून अद्रक विक्रीसाठी येते. कन्नड तालुक्यात विशेषत: अद्रकचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कन्नड येथील अद्रकने परराज्यातील अद्रकला हद्दपार केले आहे. येथे दिवाळीपर्यंत नवीन अद्रकचा माल येणार आहे. त्यामुळे बाजारात नागरीकांना नवीन अद्रक स्वस्तात मिळणार आहे.

शहरातच मागणी

ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडे बाजारात पक्की अद्रकला मागणी आहे. पक्की अद्रक जास्त दिवस टिकत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा ओढा पक्की अद्रककडे आहे. सध्या किरकोळ बाजारात पक्की अद्रक १४० रुपये किलोने विकली जाते. नवीन व कच्ची अद्रक जास्त दिवस टिकत नसल्याने शहरातच मागणी असल्याचे येथील श्री व्हेजिटेबल कंपनीचे व्यापारी पंढरीनाथ अहिरराव व पंकज खैरनार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murlidhar Mohol : राजू शेट्टी नुरा कुस्ती खेळताहेत, धंगेकर बिळातील उंदीर; जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोपावर मोहोळ यांचं प्रत्युत्तर

"हा सिनेमा सिक्वेल नाही" पुन्हा शिवाजीराजे सिनेमाच्या वादावर महेश मांजरेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले..

Latest Marathi News Live Update : मुरलीधर मोहोळ हे हतबल- रवींद्र धंगेकरांचा पलटवारक

शेतकऱ्यांची दिवाळी गाेड! 'अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८४६ कोटींची मदत'; नेमकी किती जणांना मिळाली मदत?

साेलापूर हादरलं! 'डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून युवकाचा निर्घृण खून'; गरिबी हटाव झोपडपट्टी क्र. एकमधील घटना..

SCROLL FOR NEXT