Nashik Graduate Constituency 
नाशिक

Nashik Graduate Constituency : "तांबे पिता-पुत्राने थोरातांना अडचणीत आणलं" ; राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे देशात धुरळा उडाला आहे. काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महाराष्ट्रच्या राजकारणात खळबळ उडाली. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ सुधीर तांबे यांना एबी फॉर्म देऊन देखील उमेदवारी अर्ज भरला नाही. (Nashik Graduate Constituency)

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेचे छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रसाठी आणि तांबे परीवारासाठी हे खूप वाईट आहे, असे भुजबळ म्हणाले. तसेच काँग्रेसचे नेते अडचणीत आल्याचे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले आहे.

छगन भुजबळ म्हणाले, "डॉ सुधीर तांबे दोन ते तिन वेळा विधानपरीषदेवर गेले आहेत. त्यांचा खूप साधा आणि सज्जन स्वभाव आहे. त्यांचे मेव्हण पुढारी, नेते असले तरी त्यांना गर्व नव्हता. तरी त्यांनी असं का केलं हे कळत नाही. त्यांनी सरळ सांगायला पाहीजे होतं मला एबी फॉर्म नको मी उभा राहणार नाही. एबी फॉर्म द्यायचा असेल तर सत्यजीतला द्या. सत्यजीतला सुद्धा एबी फॉर्म देता आला असता. त्यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणले आहे. त्याचे मला खूप वाईट वाटले."

बाळासाहेब थोरात सत्यजीत तांबे यांचे मामा आहेत. त्यामुळे तांबे पिता-पुत्रांच्या निर्णयामुळे थोरात यांचे खच्चीकरण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.  बाळासाहेब थोरात आणि कॉग्रेस पक्ष यांना तांबे पीता-पुत्रांकडून अंधारात ठेवलं असल्याचे बोलले जात आहे.

यामुळे आता थोरात विरोधात तांबे असा संघर्ष अहमदनगरच्या राजकारणात सुरू झाल्याची चर्चा देखील आहे. कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर करून देखील फॉर्म न भरल्याने सुधीर तांबे यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाणार का हे देखील उत्सुकतेचा विषय आहे.

सुधीर तांबे यांचं काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. पदवीधर निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाने AB फोर्म दिला तरी ही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही म्हणून पक्षाने ही निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच सत्यजीत तांबे यांनी पक्षाविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षाने त्यांचे ६ वर्षासाठी निलंबन केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT