Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal esakal
नाशिक

स्‍किल सेंटरसाठी DPDCतून पाच कोटी : पालकमंत्री भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह (SPPU) मुंबई विद्यापीठासारख्या (Mumbai University) मोठ्या विद्यापीठांच्‍या वाढत्‍या व्‍यापाने विकेंद्रीकरण होणे आवश्‍यक आहे. महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi govt) सत्तेत आल्‍यानंतर नाशिक उपकेंद्राच्‍या विषयाला गती मिळाली. उपकेंद्रातील प्रस्‍तावित स्‍किल ॲन्ड व्‍होकेशनल सेंटरसाठी जिल्‍हा नियोजन समिती (DPDC)तील पाच कोटी रुपये निधी दिला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शुक्रवारी (ता. १७) केली. पदव्‍युत्तर वैद्यकीय महाविद्यालय या वर्षीपासून सुरू होत असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिकमध्ये लवकरच उभारले जाईल, असे त्‍यांनी जाहीर केले.
शिवनई (ता. दिंडोरी) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नाशिक उपकेंद्र इमारतीच्‍या भूमिपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते.

पालकमंत्री भुजबळ म्‍हणाले, की उपकेंद्रासाठी ६३ एकर जागेपैकी ४१ एकर जागेचा ताबा मिळाला असून, उर्वरित जागा ग्रामस्थांच्‍या सहकार्याने विद्यापीठाला मिळावी. पायाभूत सुविधा विकासासाठी सर्वतो‍परी प्रयत्‍न केले जातील. सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजापर्यंत पोचविण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही.


कुलगुरू डॉ. काळे म्‍हणाले, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार उपकेंद्राच्‍या रूपाने जिल्‍हास्‍तरावर शैक्षणिक संकुल उभे राहते आहे. स्किल ॲन्ड व्‍होकेशनल सेंटरची उभारणी येथे केली जाईल. भविष्यात विद्यापीठ होण्याची क्षमता येथे असेल.मंत्री डॉ. पवार म्‍हणाल्‍या, की विश्‍वगुरू, आत्‍मनिर्भर भारत घडविण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्‍यक आहे. युवकांमध्ये आत्‍मविश्‍वास निर्माण करत आशा पल्‍लवित करण्याची ताकद शिक्षणात आहे. कतारमध्ये पुणे विद्यापीठाचे केंद्र सुरू झालेले असून, त्‍यास चांगला प्रतिसाद मिळत असल्‍याचे समाधान त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी प्रास्ताविकात एमबीए नियमित व एक्‍झिक्‍युटिव्‍ह याप्रमाणे कौशल्‍याधिष्ठत शिक्षणक्रम उपकेंद्रामार्फत सुरू व्‍हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.


‘मी तर दोन वर्षे आत राहूनही डिप्रेशन आले नाही’

‘मी दोन वर्षे आत राहून आलो, तरी डिप्रेशन आले नाही. ऑनलाइन परीक्षेऐवजी ऑफलाइन परीक्षेचे कसले आले डिप्रेशन’ असे श्री. भुजबळ म्‍हणताच उपस्‍थितांमध्ये हशा पिकला. अभ्यासाचा ताण घेण्यापेक्षा मजबुतीने उभे राहण्याचा सल्‍ला पुढे त्‍यांनी विद्यार्थ्यांना दिला.

मुख्यमंत्री ठाकरेंसह

मंत्री सामंत ‘होल्‍डवर’ दृकश्राव्‍य माध्यमाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोडलेले असताना दुसरीकडे पालकमंत्री भुजबळ रस्‍त्‍यात होते. अशात सभामंडपात भूमिपूजनासाठी मंत्री सामंत यांच्‍यासह सर्व मान्‍यवर कुदळ घेऊन उभे होते. सुमारे दहा मिनिटांच्‍या प्रतीक्षेनंतर श्री. भुजबळ दाखल झाल्‍यानंतर त्‍यांच्‍या हस्‍ते नारळ वाढवून, कुदळ मारून भूमिपूजन समारंभ झाला. तत्‍पूर्वी भुजबळांसाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्री सामंत हेदेखील होल्‍डवर राहिल्‍याची चर्चा रंगली होती.


‘आठवते ते रिपिट करतो...’

दृकश्राव्‍य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे बोलत असताना तांत्रिक बिघाडामुळे संवाद तुटल्‍याने मनोगत ऐकू आले नाही. काही मिनिटांनंतर पुनर्संपर्क केल्‍यानंतर ‘बोललेले ऐकू आले नाही का, आता जेवढे आठवते ते रिपिट करतो,’ असे मुख्यमंत्री ठाकरे म्‍हणताच उपस्‍थित खळखळून हसले. महात्‍मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्‍या प्रसाराचे महत्त्वाचे काम केल्‍याचे सांगत अनुभवसंपन्न, ज्ञानसंपन्न गुरूंचे मार्गदर्शन उपकेंद्राद्वारे विद्यार्थ्यांना मिळेल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.


सावित्रीबाई फुले अध्यासनासाठी प्रत्‍येकी तीन कोटी : सामंत

पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे स्‍मारक उभारणीसाठी तीन कोटी निधी विभागातर्फे दिला जाईल. पुणे विद्यापीठ व एसएनडीटी महिला विद्यापीठात सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्राकरितादेखील उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे प्रत्‍येकी तीन कोटींचा निधी दिला जाईल. विद्यापीठ स्‍तरावर वार्षिक स्‍नेहसंमेलन (गॅदरिंग) आयोजित केली जाणार असल्‍याची घोषणा त्‍यांनी केली.

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे अध्यक्षस्थानी होते. या वेळी केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री डॉ. भारती पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, प्रकुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, समन्‍वय समिती अध्यक्ष विजय सोनवणे, निमंत्रक प्राचार्य डॉ. व्‍ही. बी. गायकवाड यांच्‍यासह अधिसभा सदस्‍य, माजी अधिसभा सदस्‍य उपस्‍थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT