Polio Vaccination
Polio Vaccination esakal
नाशिक

Polio Vaccination : पोलिओ लसीपासून 1 हजार 53 कुटुंब वंचित! 1 लाख 13 हजार 920 बालकांना पोलिओ डोसचे उद्दिष्ट पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : जिल्ह्यासह राज्यात पोलिओ हद्दपार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सातत्याने प्रयत्नशील आहे. यासाठी वेळोवेळी पोलिओ लसीकरण मोहिमा राबविल्या जातात. काही वर्षापूर्वी मालेगावात पोलिओचा रुग्ण आढळल्याने येथे विशेष पोलिओ मोहिमा घेण्यात आल्या. असे असले तरी सर्वंकष प्रयत्न करूनही येथील १ हजार ५३ कुटुंब आजही पोलिओची लस घेतलेली नाहीत. दरम्यान नकार देणाऱ्या ६६४ कुटुंबीयांचे मन वळविण्यात महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाला यश आले आहे. महापालिकेने नुकत्याच राबविलेल्या पल्स पोलिओ लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. (nashik malegaon Polio Vaccination marathi news)

महापालिका कार्यक्षेत्रात आरोग्य विभागांतर्गत कार्यान्वित १४ नागरी आरोग्य केंद्रामार्फत ० ते ५ वर्ष वयोगटातील १ लाख १३ हजार ९२० बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्टे होते. ३ मार्चला मोहिमेचा शुभारंभ झाला. ४ ते ८ मार्च या काळात पाच दिवस पथकाने घरोघरी भेट देऊन बालकांना पोलिओची लस दिली. ९ ते ११ मार्च या काळात उर्वरित नकार कुटुंब, आजारी, बाहेर गावी गेलेल्या बालकांना पोलिओची लस देण्यात आली.

मोहीम काळात ९८६ बुथवरील २ हजार ४७९ कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यासाठी ३१२ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले होते. ० ते ५ वर्ष वयोगटातील १ लाख १३ हजार ९२० बालकांना पोलिओ लस पाजण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १ लाख १४ हजार ३२७ बालकांना पोलिओची लस देण्यात आली. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले. सदर मोहिमेसाठी महापालिका आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, प्रशिक्षित स्थानिक रहिवासी वर्कर यांचे सहकार्य घेण्यात आले. (latest marathi news)(latest marathi news)

६६४ कुटुंबातील मुलांना लस देण्यात प्रशासनाला यश

तसेच सदर मोहिमेच्या दरम्यान नकार देणाऱ्या कुटुंबीयांचे प्रबोधन करण्यात आले. आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी नकार कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांना बालकांना पोलिओची लस देण्यासाठी प्रवृत्त केले. आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव, आरोग्याधिकारी डॉ. जयश्री आहेर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, मनपा दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी, मन्सुरा वैद्यकीय कॉलेज व अल अमिन वैद्यकीय कॉलेजचे प्रशिक्षित डॉक्टर्स आदींनी देखील नकार देणाऱ्या कुटुंबीयांचे मत परिवर्तन केले. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे १ हजार ७१७ पैकी नकार कुटुंबापैकी ६६४ घरांतील सदस्यांना प्रवृत्त करून बालकांना लस देण्यात आली. महापालिका आरोग्य विभागाचे हे उल्लेखनीय यश आहे. यामुळेच लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT