Healthy Copper Brass Utensils
Healthy Copper Brass Utensils esakal
नाशिक

Healthy Copper Brass Utensils: आरोग्यदायी तांबे, पितळाच्या भांड्यांना सोन्याचे दिवस! ग्राहकांचा पुन्हा खरेदीकडे कल

सकाळ वृत्तसेवा

Healthy Copper Brass Utensils : शहरातील सराफ बाजारातील भांडी बाजाराला १९४० पासूनचा इतिहास आहे. नाशिकचा कुंभमेळा, द्राक्ष, प्राचीन मंदिरे, पर्यटन, तीर्थक्षेत्राची जशी विशिष्ट ओळख आहे तशीच ती तांबे, पितळाच्या भांड्यांचीदेखील आहे. आता वाढत्या आजारांमुळे कधीकाळी अडगळीत पडलेल्या तांबे, पितळाच्या भांड्यांना पुन्हा सोन्याचे दिवस आले आहेत. (nashik Healthy Copper Brass Utensils news)

पूर्वी तांब्या पितळाची भांडी आवडीने वापरली जात पण, भांड्यांची स्वच्छता राखणे गरजेचे आणि मेहनतीचे असल्याने नियमित कल्हई करणे, पावसाळ्यात तांब्याच्या भांड्यांना डाग पडणे, शिवाय वजनाने जड असणारी भांडी दररोज वापरणे त्रासदायक झाली. साधारण १९८०-९० च्या दशकात स्टील, ॲल्युमिनिअम त्यानंतर नॉनस्टिक, काचेची भांडी आल्यानंतर तांबे, पितळाची भांडी कायमची कपाटात जाऊन बसली.

पूर्वी नाशिकमधून इतर शहरांमध्ये भांड्यांची निर्यात होत होती. परंतु काळाच्या ओघात भांड्यांचा खप अचानक कमी झाला. आता वाढत्या आजारपणामुळे आणि कोविड साथीनंतर लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले. काही काळातच ॲल्युमिनिअम, नॉनस्टिक, प्लॅस्टिक भांड्यांचे दुष्परिणाम लक्षात यायला आल्यानंतर तांबे-पितळाच्या भांड्यांच्या विक्रीने पुन्हा जोर पकडला.

यातून कारागिरांना मोठ्या प्रमाणात हक्काचा रोजगार मिळाला. आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यात साठवलेले पाणी आरोग्यास अधिक लाभदायी असल्याचे सिद्ध झाले आहे, त्यासाठी खास तांब्याचे फिल्टर, मटका, बाटली, पिंप घ्यायला पसंती देतात. भांड्यांची खरेदी अधिक मासात शिवाय नाशिक तीर्थक्षेत्र असल्याने बाहेर राज्यातून पर्यटनासाठी आणि गंगेत स्थान करण्यासाठी भाविक येतात. तांबे शुद्ध धातू मानला जातो म्हणून नदीला, ब्राह्मणांना, जावयाला वाण देण्यासाठी तांब्याची भांडी खरेदी केली जातात. अधिक मासात सोन्या-चांदीची भांडी दिली जात असली, तरी तांब्याची वस्तु देण्याची रीत आहे.

नाशिकच्या भांड्यांची खासियत

नाशिकचे नाव पितळासाठी प्रसिद्ध आहे. इतर गावांच्या तुलनेने नाशिकमधील भांड्यांचा दर्जा कुठेही मिळत नाही. तो दर्जा विक्रेत्यांनी आजही टिकवून ठेवला आहे. ही भांडी खास कारागिरांकडून घडवून घेतली जातात. प्लेन पत्र्याला आकार देऊन तो ठोकला जातो, भट्टीत टाकल्यानंतर त्याला पॉलिश केले जाते. दिवे, दिवटी बुधली, अभिषेक पात्र, देवांच्या मूर्ती, घंटी, समई, कढई, पातेले, घंगाळ यासारख्या भांड्यांची सर्वाधिक विक्री असते, केवळ पावसाळ्यात भांड्यांना फारशी मागणी नसते.

कोट्यवधीची उलाढाल

तांब्याची भांडी ७५० रुपयांपासून पुढे मिळतात, तर पितळीची भांडी ११०० रुपयांपासून पुढे किलोने मिळतात. हीच भांडी काही काळानंतर मोड म्हणून द्यायची म्हटल्यास अर्धी किंमत (भांड्यानुसार) मिळते. याउलट स्टीलची भांडी मोड म्हणून दिल्यास ४०० रुपयांच्या भांड्यांची ४० रुपये मोड म्हणून गृहीत धरली जाते. भांडी बाजारात एकूण ११० दुकाने आहेत, तर शहरात ४५० ते ५०० दुकाने आहेत. त्यातून कोट्यवधीची उलाढाल या भांडी बाजारात होते.

"आमच्याकडे १०८ प्रकारची भांडी असून त्यातही बरेच पर्याय उपलब्ध आहेत. माझे वडील आजही हातगाड्यांवर भांडी विकतात आणि त्यांचे बरेच जुने ग्राहक आहेत जे त्यांच्याकडून खरेदी करतात. महिला पैसे साठवून, जुनी भांडी देवून नवीन खरेदी करतात तर कधी पैसे नसले तरी उधारीत खरेदी करतात."- चेतन परदेशी, विक्रेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT