Tribal women filling water at the spring in the sun. esakal
नाशिक

Nashik Drought News : हंडाभर पाण्यासाठी महिलांची हेंडसाळ; पावसाच्या माहेरघरीच नियोजन नाही

Nashik : हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात अतिदुर्गम भागातील आवळी, ओंडली शिवारातील आदिवासी महिलांना ताटकळत बसण्याची वेळ आली असून, तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन न केल्यानेच ही वेळ त्यांच्यावर आली आहे.

पोपट गवांदे,सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : पावसाच्या माहेरघरीच हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात अतिदुर्गम भागातील आवळी, ओंडली शिवारातील आदिवासी महिलांना ताटकळत बसण्याची वेळ आली असून, तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे नियोजन न केल्यानेच ही वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातच आचारसंहितेचा बडगा असल्याने लोकप्रतिनिधींचेही हात बांधले गेल्याने केव्हा एकदाची ही लोकसभा निवडणूक संपेल, याची प्रतीक्षा ग्रामीण भागातील नागरिक करीत आहे. (Igatpuri Drought)

गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून लोकसभा निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधी प्रचारात व्यस्त, तर शासकीय अधिकारी व सर्वच कर्मचारी हे निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने ऐन उन्हाळ्यात तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिलांना घोर कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्याच्या पूर्व भागाला पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत.

मायदरा येथील ठोकळवाडी व धारणोली या वाड्यांसह खेडची ठाकूरवाडी वरची व खालची या आदिवासी पाडे व वाड्यांना पाणीटंचाईचे तीव्र चटके बसू लागले आहेत. तालुक्यात बहुतांश गावांना तत्काळ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. आगामी काही दिवसात आणखी काही गावांना पाणीटंचाईच्या समस्या भेडसावणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे.

पाण्याच्या एका घोटासाठी घामाचे शेकडो थेंब गाळावे लागत असल्याची भयाण अवस्था आवळी आणि ओंडली शिवारात वन जमिन कसणाऱ्या आदिवासींची आहे. ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कष्ट करुन करतात. मात्र, त्याठिकाणी या बांधवांसाठी कोणत्याच सुविधा नाही. या लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. हंडाभर पाण्यासाठी चारपाच किलोमीटर पायी चालत भटकंती केली. तर कुठे तरी छोटासा झरा काढून पाणी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असल्याची भयाण परिस्थिती धरणांचा राजा समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील आदिवासी बांधवांची झाली आहे. (latest marathi news)

खासगी टँकरवरच मदार

पिण्याच्या पाण्याची भयाण स्थिती शहरातही असून, आठवड्यातून तीनवेळा शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यातच ऐन पाणी येण्याच्या वेळी काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. त्यामुळे रहिवांशाची चांगलीच तारांबळ उडते. अशावेळी अनेक नागरिक खासगी टँकरने पाणी विकत घेत आहे.

"ओंडली शिवारातील झऱ्यात हंडाभर पाण्यासाठी तासनतास भर उन्हात बसून पाणी भरावे लागते. कसेबसे आम्ही गढूळ पाणी पिऊन तहान भागवतोय. हे पाणी मे महिन्याच्या शेवटी संपते. मात्र, आमच्या समस्या कोणीच सोडवित नाही." - चांगुणाबाई वाघ, महिला शेतकरी

"शहरात ज्या ज्या भागात पाणीपुरवठा सुरु केला जातो. त्यावेळी या प्रभागात मुद्दाम वीज खंडीत केली जाते. त्यामुळे आठवडाभर पाणी कसे वापरायचे, हा प्रश्‍न निर्माण होतो. पाण्याचे राजकारण कोणीही करु नये. विनाकारण पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे." - रमेश शिंदे, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

Money Lending Law: महाराष्ट्रातील सावकार अडचणीत येणार! कायद्यात मोठा बदल होणार; महाराष्ट्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार

Virar News : भाजपला धक्का! भाजप महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांचा बविआत प्रवेश

SCROLL FOR NEXT