note-press-nashik.jpg 
नाशिक

नाशिक भारत प्रतिभुति व चलार्थपत्र मुद्रणालय पाच दिवस बंद

अंबादास शिंदे

नाशिक : (नाशिकरोड) भारत प्रतिभुति व चलार्थपत्र मुद्रणालय रविवारपासून पुढील पाच दिवस बंद राहणार आहे. व्यवस्थापनाबरोबर झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय झाला आहे. कोरोनामुळे काही मुद्रणालय कामगारांचा मृत्यू झाल्याने व रुग्णसंख्या वाढल्याने दोन्ही मुद्रणालय आठ दिवस बंद ठेवण्याची मागणी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी तसेच स्टाफ युनियने मुद्रएणालय व्यवस्थापनाकडे केली होती. 

2 आणि 3 सप्टेंबरला दिल्ली मुख्यालयाने सुटी दिली

व्यवस्थापनाने दिल्लीत प्रेस महामंडळाला प्रस्ताव पाठवला होता. देश लाकडाऊन झाल्यानंतर 22 मार्चपासून 8 मेपर्यंत अडीच महिने मुद्रणालय बंद होते. संपूर्ण औद्योगिक संस्था तासांच्यावर बंद ठेवता येत नाही असा नवा नियम आहे. ते लक्षात घेऊन महामंडळाने सुवर्णमध्य काढला. महामंडळाच्या निर्देशानुसार कामाचे दिवस व सुट्यांची जोडणी करुन मुद्रणालय व्यवस्थापनाने कामकाजबंदबाबत नियोजन केले. रविवारी (ता. 30) साप्ताहिक सुटी आहे. सोमवारीही (ता. 31) मुद्रणालय बंद राहील. मात्र, सोमवारचे काम पुढील रविवारी (ता. 6) करण्यात येईल. मंगळवारी (ता.1) अनंत चतुर्दशीची आर.एच. सुटी आहे. 2 आणि 3 सप्टेंबरला दिल्ली मुख्यालयाने सुटी दिली आहे.

काही कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू

आयसपी मुद्रणालयमध्ये पोसपोर्ट, सरकारी बॅंकांचे चेक्स, सरकारी मुद्रांक, पोस्टल स्टॅम्पस, लिकर सिल आदी तयार होते. तर चलार्थपत्र मुद्रणालयमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर, दोनशे व पाचशेच्या नोटांची छपाई होती. दोन्ही मुद्रणालयमध्ये मिळून एकूण पाच हजार कामगार आहेत. मुद्रणालयच्या सर्व विभागांमध्ये सॅनिटायझेशन, निर्जंतुकीकरण करुन पुर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. तरीही काही कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

करोनाची साखळी तोडण्यासाठी कामगारांनी सुटीच्या काळात घरीच थांबावे. करोनाची लक्षणे दिसताच आजार अंगावर न काढता, अथवा न लपवता त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार करुन घ्यावेत, कुटुंबातील सदस्य करोना पॉझिटिव्ह असल्यास कामावर येण्याचा धोका पत्करु नये. ज्या कामगारांनी टेस्ट करुन घेतली असेल त्यांनी रिपोर्ट येईपर्यंत सुटी घ्यावी असे आवाहन गोडसे यांनी केले आहे.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! आठवड्यात 6 हजारांची घसरण; आजचा 1 तोळ्याचा भाव किती?

Hockey World Cup चे बिगूल वाजले! भारत-पाकिस्तान संघात पुन्हा आमने-सामने; १६ संघांचे ग्रुप्स जाहीर

SCROLL FOR NEXT