epoxy furniture making from wood esakal
नाशिक

Inspirational Story : ‘इपॉक्सी’ फर्निचर निर्मितीने दाखविली ‘प्रकाशवाट’!

Inspirational Story : लाकडापासून उत्तम इपॉक्सी फर्निचर निर्मिती करीत अनेकांचा बाभळाच्या झाडाकडे व लाकडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काकुळते कुटुंबीयांनी बदलवला आहे.

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

Inspirational Story : ज्या बाभळाच्या झाडाकडे काटेरी झाड अन् त्याच्या लाकडाकडे जळाऊ लाकूड म्हणून पाहिले जाते, त्याच लाकडापासून उत्तम इपॉक्सी फर्निचर निर्मिती करीत अनेकांचा बाभळाच्या झाडाकडे व लाकडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काकुळते कुटुंबीयांनी बदलवला आहे. कर्जाच्या काटेरी खाईत असताना एका काटेरी झाडाने काकुळते कुटुंबीयांच्या अंधारलेल्या आयुष्यात ‘आशेचा किरण’ आणत एक ‘प्रकाशवाट’ तयार केली. सध्या काकुळते कुटुंब इपॉक्सी फर्निचर विदेशात पाठवत आहे. देवळा तालुक्यातील काकुळते कुटुंबीयांची ही यशोकथा. (nashik Inspirational Story of progress shown by Epoxy furniture to kakulte family marathi news)

मूळचे खालप (ता. देवळा) येथील काकुळते कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती. स्वमालकीची साडेतीन एकर शेतजमीन. प्रकाश काकुळते यांनी १९९५-९६ मध्ये बीड येथे फाउंडेशन एटीडीचे शिक्षण घेतले. त्यानंतर २००० मध्ये नाशिक येथील चित्रकला महाविद्यालयात फाईन आर्टचे शिक्षण घेतले. त्या आधारे त्यांना बाऱ्हे (ता. सुरगाणा) येथे कलाशिक्षक म्हणून नोकरीची संधी चालून आली. मात्र, त्यांनी त्या नोकरीला नकार दिला.

शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक ठिकाणी पेंटिंगचे काम केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काचेवर इचिंग पेंटिंगचे काम सुरू केले. शेती व्यवसायातही लक्ष दिले. पॉलिहाउसमध्ये सिमला मिरचीच्या प्रयोगात ते कर्जबाजारी झाले. अशा परिस्थितीत प्रकाश व किरण या दोन्ही भावांना वडील अर्जुन काकुळते, आई कासूबाई, निवृत्त मुख्याध्यापक धनंजय काकुळते यांनी धीर दिला.

सरतेशेवटी त्यांनी पॉलिहाउसचा नाद सोडला. डोक्यावर बँकेचे व सावकारी कर्जाचे ओझे स्वस्थ बसू देत नव्हते. बीडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी नाम फाउंडेशनमार्फत आयोजित कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन केले, की कर्ज ही फार मोठी गोष्ट नाही. कर्जाचा कितीही मोठा डोंगर झाला तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करीत राहिल्यास त्यावरही योग्य पद्धतीने मात करता येते. (latest marathi news)

लाकडापासून उत्तम इपॉक्सी फर्निचर निर्मिती

हे विचार ऐकून काकुळते बंधूंना धीर मिळाला. प्राप्त परिस्थितीत त्यांनी पेंटिंगचे काम सुरू ठेवले. कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी झाली. या काळात यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ पाहायचे. नितीन गडकरी यांचे काही व्हिडिओ प्रकाश काकुळते यांना पाहायला मिळाले. त्यात गडकरी सांगत, की यूट्यूब व गुगलच्या माध्यमातून नवीन काहीतरी शोधा. ‘उद्योजक बना’. गडकरी यांच्या भाषणांमुळे प्रकाश काकुळते प्रभावित झाले अन् त्यांनी यूट्यूब व गुगलच्या माध्यमातून नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

या काळात बांधकाम व्यावसायिक श्‍यामकांत मराठे यांच्या रूपाने प्रकाश काकुळते यांना आधार मिळाला. त्यांनी प्रकाश यांची कला अनुभवली होती. मराठे यांनी प्रकाश काकुळते यांना इपॉक्सी फर्निचरबद्दल सांगितले. ‘तू हे करू शकतो’ असे सांगत बळ दिले. याच शब्दांच्या आधारे प्रकाश यांनी आपला मोर्चा इपॉक्सी फर्निचरकडे वळविला. लहान भाऊ किरण विज्ञान शाखेतून बारावी झालेला. त्यामुळे त्याला इंग्रजी भाषेचे ज्ञान होते.

प्रकाश काकुळते रोज लहान भावाला इपॉक्सीसंदर्भातील यूट्यूब लिंक पाठवत आणि त्याबद्दल अभ्यास करायला सांगत. लहान भाऊ किरणही त्यावर अभ्यास करीत असे. त्यातून इपॉक्सीबाबत माहिती मिळवली. यासाठी लागणारे मशिन कोणते? कोणत्या मशिनद्वारे कोणते काम होते? याबाबत सर्व अभ्यास केला. दोन्ही भावांनी आपल्यातील कल्पनाशक्तीच्या आधारे टाकाऊ वस्तूंपासून मशिन तयार केले; तर काही मशिनरी विदेशातून मागवली.

ज्या लाकडाकडे एक जळाऊ लाकूड म्हणून पाहिले जाते, त्या लाकडापासून त्यांनी इपॉक्सी फर्निचरची निर्मिती करण्यास सुरवात केली. कोरोना काळ कुणासाठी काहीही असो, मात्र तो काकुळते कुटुंबीयांसाठी पर्वणी ठरला. हे कामे करीत असताना प्रकाश यांना अहमदाबाद येथील उद्योजकांकडून मार्गदर्शन मिळाले. विदेशात कशा प्रकारच्या इपॉक्सी फर्निचरला मागणी आहे, याबाबत त्यांना त्यांच्याकडूनच माहिती मिळत गेली.

आता ते उद्योजक काकुळते कुटुंबीयांकडून इपॉक्सी फर्निचर खरेदी करतात. एकेकाळी घरातील महिलांच्या हाती शेतीकामासाठी लागणारे खुरपे असायचे, त्याऐवजी आता त्यांच्या हाती लाकडाला फिनिशिंग करणारे मशिन आले आहे. आजमितीस काकुळते कुटुंबातील दोन्ही महिला वैशाली काकुळते व सुवर्णा काकुळते सर्व प्रकारचे मशिन हाताळतात. युरोप, जर्मनी येथून त्यांनी अनेक प्रकारचे मशिन खरेदी केले आहेत.

यात कुठल्याही प्रकारच्या वस्तू बनविताना प्रकाश काकुळते सुरवातीला त्याची डिझाइन तयार करतात आणि त्या प्रकारे लाकडाला आकार देतात. यात त्यांना त्यांच्या चित्रकलेच्या शिक्षणाचा मोठा उपयोग होत आहे. हे काम करीत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारे मजूर लावलेले नसून, ही सर्व कामे प्रकाश काकुळते, किरण काकुळते व कुटुंबीय स्वतः करतात. यासाठी लागणारे बाभळाचे लाकूड ते मालेगाव येथून खरेदी करतात.

गरजूंना काम देण्याचा प्रयत्न

व्यवसायासाठी प्रकाश यांची चित्रकला आणि किरण यांचे विज्ञानातील शिक्षण बहुपयोगी ठरत आहे. काकुळते कुटुंब इपॉक्सी व बाभळाच्या लाकडापासून टिपॉय, डायनिंग टेबल, टॉप, कॉफी टेबल, गार्डन बेंच, व्हेजिटेबल कटिंग पॅड, चॉपिंग बोर्ड, कँडल स्टँड यांसारख्या विविध प्रकारच्या वस्तू बनवितात. या त्यांच्या व्यवसायात त्यांनी योग्य प्रकारे व्यवस्थापन केले आहे. या व्यवसायासाठी त्यांना केदा आहेर, भाऊसाहेब पगार, भगवानदास खरोटे यांसारख्या व्यक्तींची साथ लाभली. आगामी काळात खालप गावातील बचत गटाच्या महिलांना व गरजू हातांना आपल्या माध्यमातून काम मिळवून देण्याचा त्यांचा ध्यास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT