In an event organized on the occasion of World Skills Day esakal
नाशिक

Nashik News: नाशिक औद्योगिक प्रशिक्षण (मुलींची) संस्थेस राज्यातील सर्वोत्कृष्ट ITI पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात जागतिक कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्वोत्कृष्ट आयटीआयचे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची नाशिक या संस्थेस सर्वोत्कृष्ट आयटीआयचा पुरस्कार रुपये पाच लाख, प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे सचिव आशिष कुमार सिंह, आयुक्त एन. रामास्वामी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्याचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक पी. एम. वाकडे उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्राचार्य दीपक बाविस्कर, संस्थेच्या संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ निदेशक संजय म्हस्के यांनी स्वीकारला. (Nashik Institute of Industrial Training (Girls) awarded best ITI in state News)

औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची या संस्थेने प्रशिक्षणार्थ्यांकरिता राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजना, तसेच मागील तीन वर्षापासून प्रवेशाचे १०० टक्के असणारे प्रमाण, कमीत कमी गळती तसेच, ७७ टक्के प्रशिक्षणार्थींना Aprentiship च्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

या स्पर्धेत हे महत्त्वपूर्ण निकष असल्याने या संस्थेस राज्यातील सर्वोत्कृष्ट आय.टी.आय.चा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या बरोबरच संस्थेने प्रशिक्षणार्थ्यांकरिता संस्थेत उपलब्ध करून दिलेल्या अनेक सोयी-सुविधा तसेच अद्ययावत वसतिगृह, कॉमन किचन, शुद्ध पिण्याचे पाणी, स्मार्ट क्लासरूम, लायब्ररी, परिसर विकास, २४ तास बॅकअप असणारे जनरेटर, प्रशिक्षणार्थ्यांकरिता १०० टक्के ऑनजॉब ट्रेनिंगची सुविधा.

प्रशिक्षणार्थिंकरिता संस्थेत वेळोवेळी होणार फॅशन शो, तंत्र प्रदर्शन, कौशल्य वर्कशॉप, पर्सेनिलिटी डेव्हलपमेंट प्रोग्रॉम या सारख्या बाबींमुळे ही संस्था राज्यात सर्वोत्कृष्ट म्हणून गणली गेलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT