Ram Nagre, Arvind Khode, Akash Khode, Shakuntala Kansara etc. gathered near the entrance. The sprinkler in the second photo is covered in dust esakal
नाशिक

Nashik News : धुळवडीमुळे इंदिरानगरचे जॉगर्स त्रस्त; स्प्रिंकलर धूळखात

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर अनियमित पाणी मारले जात असल्याने जॉगिंगसाठी येणाऱ्या शेकडो नागरिकांना जॉगिंग करत आहोत की धुळवड खेळत आहोत, असा प्रश्न पडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर अनियमित पाणी मारले जात असल्याने जॉगिंगसाठी येणाऱ्या शेकडो नागरिकांना जॉगिंग करत आहोत की धुळवड खेळत आहोत, असा प्रश्न पडला आहे. धुळीमुळे अनेकांना सर्दी, खोकला आदींसह श्वसनाच्या आजारांचा त्रास सुरू झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे लाखो रुपये खर्चून नियमित पाणी मारले जावे यासाठी उभारलेले स्प्रिंकल पाणीच नसल्याने फक्त शोसाठी दिसत आहेत. (Nashik Joggers of Indiranagar are suffering due to dust marathi news)

स्प्रिंकलसाठी ज्या विहिरीतून पाणी वापरले जायचे, ती विहीरच मालकाने बुजवल्याने हा सगळा खर्च वाया गेला की काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. जॉगिंग ट्रॅक संबंधात नागरिक नेहमीच उघड्या नाल्यातून वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी, त्याद्वारे होणारी डासांची पैदास आदी तक्रारी करत असतात. सध्या मात्र पाणी कमी आणि चुकीच्या वेळी मारले जात असल्याने धुळीचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

चालत असताना स्पष्ट धुळीचे लोट दिसून येतात. या ठिकाणी दिवसा पाणी मारले जाते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीतून ते पूर्णतः सुकते. त्यात काही ठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे ट्रॅक्टर टाकलेले दगडदेखील वर येण्यास सुरवात झाली आहे. धुळीमुळे येथे ठेवलेल्या बाकांवर विश्रांतीसाठी बसता येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

बुधवारी (ता. २०)सकाळी त्रस्त झालेल्या आकाश खोडे, राम नागरे, प्रकाश खोडे, अरविंद खोडे, एम. एच. पटेल, शकुंतला कंसारा, जयश्री कुलकर्णी, शुभा चंद्रात्रे, मंगेश गोडसे, के. सी. त्रिपाठी, नदीम पठाण, हिंमतराव गर्ते आदींनी जॉगिंग ट्रॅकच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येत तीव्र भावना व्यक्त केल्या. महापालिकेच्या संबंधितांना याबाबत अवगत करण्यात आले. (latest marathi news)

धनंजय थोरात यांच्या मालकीच्या विहिरीतून पाणी वापरण्याचे नियोजन करण्यात आले होते. एक महिना सुरळीत चालले. मात्र, संबंधितांना त्या महिन्याचे बिल मनपाने चुकते केले नसल्याचे समजते. त्यानंतर श्री. थोरात यांनी ही विहीरच बुजवून टाकल्याने ही स्प्रिंकलरची यंत्रणा आता फक्त शोसाठी शिल्लक आहे. येथील सती आसरा मंदिराजवळ हातपंप आहे.

त्याला मुबलक पाणी आहे. तेथे जलपरी अथवा इतर सुविधा करून ही स्प्रिंकलरची व्यवस्था पुन्हा सुरू करता येणे शक्य असल्याचे नागरिकांनी सांगितले. या भागातच असलेले अजून एक खासगी विहीर मालक पाणी देण्यासाठी तयार आहेत. मात्र प्रशासनाची इच्छाशक्ती नाही, असे नागरिक सांगतात.

''पाण्याच्या कमतरतेमुळे येथे धुळीचे साम्राज्य आहे. यामुळे व्यायामाचा शरीराला फायदा होण्याऐवजी तोटा होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना धुळीचा मोठा त्रास होत आहे. धूळखात पडलेली स्प्रिंकलरची सुविधा पर्यायी व्यवस्था करून सुरू केली पाहिजे.''- प्रकाश खोडे, जॉगर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT