Maharudra Ashturkar esakal
नाशिक

Nashik Kala Katta: तालासुरांशी समरस होणारे छायाचित्रकार : महारुद्र आष्टुरकर

सकाळ वृत्तसेवा

"कोणताही कलाविष्कार साकारताना त्यातील कलाकाराला त्याच्या कल्पनाविश्वात त्या कलेचे एक निराकार प्रतिबिंब आधीच दिसते. या निराकार दिसण्याला जेव्हा चिंतनाची जोड मिळते, तेव्हाच ते प्रतिबिंब मनात रुजते आणि त्या अंकुरातून कलेचा आकार जन्म घेत असतो. आपल्याच मनातील प्रतिबिंबाचा हा आकार न्याहाळण्याचा पहिलावहिला क्षण म्हणजेच त्या कलाकृतींची ‘सम’. संगीताच्या मैफलीत या समेची कलाकाराला आणि रसिकांना जशी ओढ असते, तशीच ती एखाद्या छायाचित्रकारालाही असू शकते का? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्याचे उत्तर मैफलीच्या समेवर पडलेल्या एका ‘क्लिक’ने दिले. ही ‘क्लिक’ होती, नाशिकचे रसिक छायाचित्रकार महारुद्र आष्टुरकर यांची..."- तृप्ती चावरे-तिजारे.

(Nashik Kala Katta photographer in harmony with Talasuras Maharudra Ashturkar)

त्यांचा कॅमेरा अशा टायमिंगने छायाचित्र टिपतो की, रसिकांच्याही आधी साक्षात सादरकर्त्या कलाकाराच्या मुखातून एकच शब्द उमटतो, वाहवा! अनेक मोठ्या कलाकारांच्या तोंडून वाहवा मिळविणारे महारुद्र आष्टुरकर ‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना म्हणतात, फोटोग्राफी हे जरी एक तंत्र असले तरी, ते तंत्र कुठे आणि कसे वापरावे याचे टायमिंग समजणे ही मात्र एक कला आहे.

कलाकाराचे छायाचित्र टिपताना मला त्याच्या आतमधले भावविश्व खुणावत असते. या भावविश्वाशी, त्या कलाकारांसह संपूर्ण मैफलीचा एक संवाद सुरू असतो. तो ऐकू येण्यासाठी एक फोटोग्राफर म्हणून मला प्रतीक्षा तर करावी लागतेच, पण तितकेच त्या कलेशी समरसही व्हावे लागते.

तरच आणि तेव्हाच गाठता येतो, त्या मैफलीचा उत्कट क्षण अर्थात, त्या कलाविष्काराची ‘सम’. संगीताच्या तालासुरांशी समरस होणारे छायाचित्रकार म्हणून अल्पावधीतच कलाक्षेत्रात लोकप्रिय झालेल्या महारुद्रजींनी लग्न समारंभाच्या फोटोग्राफीपासून या क्षेत्रात पाऊल ठेवले.

परंतु तिथे त्यांचे मन रमेना, म्हणून ते कलाक्षेत्रातील फोटोग्राफीकडे वळले. त्यांचे वडील अंबादासराव आष्टुरकर हे उत्तम कीर्तनकार. घरात बालपणापासूनच संगीताचे वातावरण. योग्य वयातील अभिजात संगीत श्रवण-संस्कार आणि गायन-वादनात रमून आणि जमून फोटोग्राफी करण्याचा स्वभाव.

या दोन गुणांमुळे महारुद्रजींचा कान असा तयार झाला, की त्यांना कलाकारांचे भावविश्व कळू लागले. आनंदून जाण्याच्या जागाही समजू लागल्या. कान, मन आणि डोळा यांच्या नात्यातून त्यांचा कॅमेरा नकळतपणे केव्हा गाऊ लागला हे त्यांनाही समजले नसावे.

रसिकांचे कान आणि मन तृप्त करणाऱ्या अनेक कलाकारांचे डोळे महारुद्रजींच्या फोटोग्राफीने तृप्त होऊ लागले, अशी जादू त्यांना साधली. यातूनच अनेक कलाकारांशी त्यांचे सूर असे काही जुळले की त्यांचा कॅमेरा हा अनेक दिग्गज कलाकारांच्या मैफलीचा एक हक्काचा साथीदार झाला.

सुरेल मैफलीची रंगत, मैफलीनंतरही रंगवीत ठेवणारे महारुद्रजी आजच्या तरुण पिढीला संदेश देताना म्हणतात, प्रत्येक फोटोतून मी घेतलेला ठाव हा किती अचूक आहे हे मला ओळखता आले तरच कलाकाराची कलात्मक प्रगती होते.

कलाक्षेत्रात काम करताना व्यवहारपेक्षा, त्या कलेत समरस होणे हे मला अधिक महत्त्वाचे वाटते. ज्यांना हे समजते, त्यांना ती कलादर्शन देते. या दर्शनाचे समाधान तुमच्या कलेतून दिसते. ‘फ्लॅट लाइट’ मध्ये जी ‘डेप्थ’ टिपता येत नाही ती ‘डेप्थ’ शेडींग फोटोग्राफीमध्ये टिपता येते.

कलेचीही डेप्थही अशीच असते. छाया-प्रकाशाच्या खेळात, कलाकाराच्या चेहऱ्यावर ती ‘डेप्थ’ समजते आणि हावभाव तिथेच टिपता येतात. ही ‘डेप्थ’ समजण्यात आणि जोपासण्यात एक वेगळी मजा आहे.

दृकश्राव्य कला जिवंत करता येतात, पण त्यांना आयुष्य नसते. मैफल हवेत विरून जाते, दृश्यदेखील कालांतराने धूसर होत जाते. पण आठवणींच्या संजीवनीने विस्मरणात गेलेली मैफल पुन्हा ताजी होऊन जेव्हा गाऊ लागते, तेव्हा हातात महारुद्रजींची छायाचित्रे गात असतात.

त्यामागे नुसते ‘आहे ते दाखवणे’ इतकाच मर्यादित विचार नसतो, तर, असण्याच्याही पलीकडचे एक दिसणे असते, ज्याला चैतन्य असे म्हणतात. या चैतन्यामुळे महारुद्रजींचे फोटो, कधी गात असतात, कधी वाजत असतात, तर कधी नाचतही असतात.

अनेक मैफलींचे हे चैतन्य आठवणींच्या रूपाने महारुद्रजी आपल्या निर्जीव कॅमेऱ्यात कैद करून साकारतात, जणू मैफलीनंतरही कानांना आठवणींचा चिरंतन सूर ऐकू यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT