White-flowered nets of karvandas in the western and tribal areas of the Kasara Ghats of Igatpuri taluka.
White-flowered nets of karvandas in the western and tribal areas of the Kasara Ghats of Igatpuri taluka. esakal
नाशिक

Nashik News : डोंगरची काळीमैनेला आला बहर! आदिवासी भागातील डोंगरदऱ्यात बहरू लागली करवंद

विजय पगारे

इगतपुरी : डोंगरची काळी मैना म्हणून सर्वदूर परिचित असलेली करवंदे इगतपुरी, अकोला (जि.नगर) तालुक्यातील दुर्गम आणि कसारा घाटाच्या आदिवासी भागातील डोंगरदऱ्यात बहरू लागली असून आता रानमेवाही तयार होऊ पाहत असल्याने आगामी दोन महिने या भागात रानमेव्याचा आस्वाद घेता येणार असून आदिवासी बांधवांसाठी स्वतःच्या हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. (Nashik Karvand of tribal areas igatpuri akola marathi news)

चैत्र महिन्याच्या सुरवातीला प्रथम दर्शन होते ते आंबट गोड करवंदांचे. डोंगराच्या कुशीत याच्या काटेरी जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगांचे करवंदांचे घड बहरतात. पिकल्यावर त्यांचा रंग काळा होतो आदिवासी बांधव पहाटे लवकर करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करत असतात.

या भागातील करवंदे मुंबई, कल्याण, नाशिक, मालेगाव, धुळेपासून तर जळगावपर्यंत पाठवली जातात. मात्र हक्काची बाजारपेठ नसल्याने व्यापारी वाटेल त्या भावात करवंदे खरेदी करून विक्री करतात. तर लहान बालके व वृद्ध महिला पळसाच्या पानांचे द्रोण भरून दिवसभर महामार्गाच्या कडेला बसून करवंदांची विक्री करतात. (latest marathi news)

करवंदापासून आर्युवेदिक लोणचे

आंब्याचा मोसम सुरू होण्यापूर्वीच करवंदाचा मोसम सुरू होत असल्याने कच्च्या करवंदापासून चांगल्या प्रतीचे आर्युवेदिक लोणचे तयार करण्यात येते. काही वर्षापूर्वी या भागातील महिला बचत गटांनी करवंदापासून लोणचे तयार करण्याचा गृह उद्योग सुरू केला होता.

मात्र पाहिजे त्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने हा उद्योग डबघाईस आला. आदिवासी बेरोजगार तरुण व महिलांना करवंदापासून विविध खाद्यपदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान व तयार केलेला माल विक्रीसाठी शासनाने बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास हक्काचा रोजगार मिळू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाच्या चौकशीसाठी बाल हक्क मंडळाची पोलिसांना परवानगी, बाप अन् आजोबांचे असहकार्य

First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 1 जून 2024

Latest Marathi News Live Update: शेटवच्या टप्प्यातील मतदानाला थोड्याच वेळात सुरूवात

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT