sakal (42).jpg 
नाशिक

मार्च अखेर पासून नाशिक-कोलकता विमानसेवा! महत्त्वाचे औद्योगिक शहर जोडले जाणार 

विक्रांत मते

नाशिक : दिल्ली, हैदराबाद, पुणे अहमदाबाद, बेंगळुरूपाठोपाठ नाशिकमधून कोलकता या मेट्रो शहरात विमानसेवा २९ मार्चपासून सुरू होणार असून, त्यासाठी स्पाइस जेटतर्फे बुकिंग सुरू करण्यात आले आहे. दिल्ली सेवा सध्या आठवड्यातून चार दिवस आहे. १ एप्रिलपासून दररोज सेवा सुरू केली जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. 

आठवड्यातून चार दिवस
अलायन्स एअर कंपनीतर्फे अहमदाबाद, हैदराबाद, पुणे स्पाइसजेट कंपनीतर्फे दिल्ली, पुणे, बेंगळुरू, तर ट्रुजेट कंपनीतर्फे अहमदाबाद, तर स्टार एअरवेज कंपनीतर्फे बेळगाव हवाई सेवा सध्या सुरू आहे. आता नाशिकच्या हवाई सेवेचा आणखी विस्तार होत असून, कोलकता हे महत्त्वाचे औद्योगिक शहर जोडले जाणार आहे. स्पाइस जेट कंपनीतर्फे सोमवार ते शनिवार असे सहा दिवस २९ मार्चपासून सेवा सुरू होईल. सध्या दिल्लीसाठी आठवड्यातून चारदा उड्डाण होते. मात्र, आता सोमवार ते रविवार असे सात दिवस उड्डाण होईल.

अंतर्गत व बाह्य कनेक्टिव्हिटीची नाशिकमध्ये वाढ

१ एप्रिलपासून दिल्ली हवाई सेवेचा विस्तार होईल. नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी काही दिवसांत महापालिकेतर्फे शहर बससेवा सुरू केली जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ हवाई सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अंतर्गत व बाह्य कनेक्टिव्हिटी नाशिकमध्ये वाढत असल्याचे यानिमित्त स्पष्ट होत आहे. 


नाशिकमधून कोलकता शहराला जोडणारी हवाईसेवा सुरू होणार असल्याने दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, हैदराबादपाठोपाठ आणखी एक मेट्रो शहर नाशिकशी जोडले जाणार असून, त्याचा उद्योग-व्यवसायासाठी नक्कीच फायदा होईल. -मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, नाशिक  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT