Rede, pardya etc. animals that came for sale in the market committee. In the second picture, a buck sold for 51 thousand rupees esakal
नाशिक

Bakri Eid 2024 : मालेगावला बोकड 51 हजार तर रेडा 2 लाखापर्यंत; मोठ्या प्रमाणावर जनावरांची विक्री

Bakri Eid : बकरी ईदच्या पाश्‍र्वभूमीवर येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीसाठी आली होती.

सकाळ वृत्तसेवा

विनोद चंदन : सकाळ वृत्तसेवा

Bakri Eid 2024 : बकरी ईदच्या पाश्‍र्वभूमीवर येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीसाठी आली होती. कोंबडी, पाणकोंबडी, बोकड, बकरी, मेंढी, म्हैस, रेडा, पायडी आदी जनावरांच्या खरेदी-विक्रीत लाखो रुपयांची उलाढाल झाली. ५१ हजार रुपयांपर्यंत बोकड तर दोन लाखापर्यंत रेडा विकला गेला. जनावरांच्या बाजारामुळे बाजार समिती आवार वाहनांनी फुलून गेला होता. दुष्काळी परिस्थिती असली तरी सणामुळे बाजारात तेजी दिसून आली. ( animals sale in market committee here on occasion of Bakri Eid )

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी जनावरांचा बाजार भरतो. १७ जूनला बकरी ईदचा सण साजरा होत आहे. बकरी ईदला जनावरांची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे बकरी ईदमुळे येथील मुस्लीम बहुल भागात गेल्या काही दिवसापासून जनावरे खरेदीला सुरवात झाली आहे.

बकरी ईदच्या पाश्‍र्वभूमीवर जनावरांच्या आठवडे बाजारात अपेक्षेप्रमाणे मोठी गर्दी झाली. विविध गावातील व्यापारी देखील आले होते. बाजार समिती आवारात व आवाराबाहेर मुख्य रस्त्यावर पिकअप, छोटी मालवाहतूक गाडीतून जनावरे विक्रीसाठी आणण्यात आली होती.

विविध जातीचे बोकड दाखल

दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांच्या दरात कमी अधिक तफावत पाहायला मिळाली. चाऱ्या, पाणी अभावी, दुष्काळी परिस्थिती असल्याने काही शेतकऱ्यांनी जनावरे विक्रीस आणले होते. यात बोकडाला सर्वाधिक मागणी होती. सोजर, बिटल, शिरोई, उस्मानाबादी, कोटा, भोर, जमनापुरी, तोताकर, सानेईम अशा विविध जातीचे बोकड बाजारात विक्रीस आले होते. त्यांचे दर २५ ते ५१ हजार रुपयांपर्यंत होते.

मुरा, पंजाबी, मासान, बंनी, हरियाणा, जाफर, गिर जाफर, नारळी आदी जातीचे रेड्यांची येथे विक्री झाली. २० हजार ते दीड लाखपर्यंत रेड्यांचा भाव होता. व्यापाऱ्यांनी मध्यप्रदेश, हरियाणा, कसमादे पट्ट्यातून येथे जनावरे विक्रीसाठी आणले होते. गत वर्षापेक्षा यावेळी बोकड, रेडा, पायडी यांच्या किमती कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

जनावरांची नाव व दर

कोंबडी - ५०० ते ७०० रुपये नग

मेंढी.... ५ ते ७ हजार रुपये नग

बोकड....२१ ते ५१ हजार रुपये नग

रेडा....२० हजार ते दीड लाख

म्हैस... ३० हजार ते ९० हजार

बैलांची किमती स्थिर

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांनी बैल विक्रीसाठी आणले होते. आधुनिक युगात अनेक शेतकरी ट्रॅक्टर मशागत व इतर शेतीची कामे करतात. लहान शेतकरी मात्र अजूनही पारंपारिक पद्धतीने बैलजोडीच्या मदतीनेच कामे करीत आहेत. पुरेसे ग्राहक नसल्याने बैलांच्या किमती स्थिर आहे. ३० ते ७० हजारापर्यंत बैलाची किंमत आहे. जोडीसाठी ६० हजार ते दीड लाख रुपये मोजावे लागतात.(latest marathi news)

हजाराहून अधिक जनावरांची विक्री

समिती आवारात बोकड, रेडा, पायड्या आदी हजारापेक्षा अधिक जनावरे विकली गेली. यातून बाजार समितीला दीड लाखाच्या आसपास उत्पन्न मिळाले. जनावरांच्या बाजारात प्रथमच जनावर मालकांना आधारकार्ड व जनावरे स्वमालकीची असल्याचा दाखला बंधनकारक करण्यात आला होता.

''दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांना चारा नाही. पावसाअभावी उत्पन्न आले नाही. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यातच मुलीचे लग्न केल्याने अडचण निर्माण झाली. यामुळे जनावर विकावे लागले.''- संतोष मोहिते, धांद्री

''बाजारात विक्रीसाठी आलेले जनावरांची किंमत दुष्काळी परिस्थितीमुळे २० ते २५ टक्क्यांनी कमी झाली आहे. शेतीसाठी बैलजोडी गरजेची असते. यासाठी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांकडून बैल खरेदी होत आहे.''- सुभाष हारदे, नामपूर, बैल व्यापारी

''दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी, चारा नाही. अशा परिस्थितीत जनावरे सांभाळणे शक्य नाही. त्यामुळे विक्री करावी लागली.''- संभाजी बच्छाव, शेतकरी बिजोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT